कोणतीही मेहनत न करता घाण-पिवळे टॉयलेट सीट होईल क्षणार्धात साफ, या 10 रुपयांच्या वस्तूचा करा वापर
आपले घर स्वछ असावे असे सर्वांना वाटतं असते. बऱ्याचदा घरातील कोपरा कोपरा साफ केला जातो मात्र टॉयलेट साफ करणे राहून जाते. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यापेक्षा टॉयलेट स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. हाईजीन मेंटेन करण्यासाठी टॉयलेट पिवळे दिसू नये, तर ते नेहमी चकाचक राहावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. जेणेकरून, पाहुणे आले की, घाणेरडे टॉयलेट पाहून लाजिरवाणे वाटू नये. आता अनेकांना घरातील टॉयलेट सीट साफ करणे फार कठीण काम वाटत असते. आम्ही सांगत असेलल्या या ट्रिकने आता तुम्हाला कठीण वाटतं असलेले हे काम सोपे होणार आहे.
तासनतास टॉयलेट घासण्याचे कष्ट टाळण्यासाठी लोक बाजारातून महागडे क्लिनर विकत घेतात आणि, कधीकधी हे महागडे क्लिनर देखील प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, कमीत कमी खर्चातही तुम्ही टॉयलेट पूर्णपणे चमकदार बनवू शकता. यासाठी तुम्हाला 10 रुपयांना मिळणारे फ्रूट सॉल्ट वापरावे लागेल आणि साफसफाईची योग्य प्रक्रिया जाणून घ्यावी लागेल. याच्या मदतीने कोणतीही अधिक मेहनत न घेता तुम्ही काही क्षणातच तुमच्या घरातील घाणेरडा टॉयलेट चकचकीत साफ करू शकता.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
क्लिनर बनवण्यसाठीचे साहित्य
अशाप्रकारे बनवा घरगुती क्लिनर
यासाठी सर्वात आधी एका भांड्यात अर्ध्या लिंबाचा रस काढा. आता त्यात अर्धा डिटर्जंट पावडर एका छोट्या चमच्याने घाला. आता अर्धा लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे लागेल. जर टॉयलेट सीट खूप गलिच्छ दिसत असेल तर तुम्ही बेकिंग सोडा देखील घालू शकता. हे सर्व चमच्याने नीट मिसळून झाल्यावर शेवटी एक छोटा पॅकेट एनो पावडर म्हणजेच फ्रूट सॉल्ट घाला आणि मिसळा. आता तुमचा क्लिनर घरच्या घरी बनून तयार आहे.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
टॉयलेट क्लीन करण्याची पद्धत
होममेड क्लिनरने टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी, हे तयार द्रावण टॉयलेट सीटमध्ये ओता आणि ब्रशच्या मदतीने पसरवा आणि काही काळ असेच राहू द्या, आता ब्रशने घासून टॉयलेट स्वच्छ करा. तुम्हाला डाग निघेपर्यंत काही वेळ टॉयलेट घासावे लागेल, त्यानंतर यावर पाणी ओतून टॉयलेट सीट स्वच्छ करा. यानंतर तुम्ही पाहाल की यावरील पिवळा डाग दूर झाला असेल आणि तुमचे टॉयलेट नव्यासारखे चमकत असेल.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.