Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरच्या घरी केसरची लागवड! कमी खर्चात उगवा ‘लाखमोलाचा’ मसाला, जाणून घ्या सोपी पद्धत

केसर हा अत्यंत मौल्यवान मसाला असून आरोग्य, स्मरणशक्ती आणि त्वचेसाठी उपयुक्त मानला जातो. काश्मीरचा केसर सर्वोत्तम मानला जातो आणि त्याची किंमत प्रतिकिलो ५–६ लाख रुपये आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 29, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

केसर हा अत्यंत मौल्यवान आणि गुणकारी मसाला मानला जातो. आयुर्वेदात केसरला आरोग्यासाठी उपयुक्त ठरवले असून स्मरणशक्ती वाढवणे, त्वचेचे आरोग्य सुधारणे, ताणतणाव कमी करणे अशा अनेक फायद्यांचा उल्लेख आहे. मात्र केसरची लागवड आणि त्याची काढणी ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने केसर बाजारात महाग मिळतो. सध्या भारतात काश्मीरमधील केसर सर्वोत्तम मानला जातो आणि त्याची किंमत प्रतिकिलो ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत जाते. जगातील सुमारे ९० टक्के केसर उत्पादन इराणमध्ये होते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर घरच्या घरी केसर उगवता येतो, असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. इंस्टाग्रामवरील myplantsmygarden या पेजवर राणी अंशू यांनी घरच्या घरी केसर यशस्वीपणे उगवल्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितलेली पद्धत सोपी, कमी खर्चिक आणि घरच्या घरी करता येण्यासारखी आहे.

Health Care : हिवाळ्यात तोंड झाकून झोपताय? आजच मोडा सवय अन्यथा यमदेवाला तुमचा पत्ता लागलाच म्हणून समजा

केसर हा सॅफ्रन क्रोकस या फुलाच्या आतून मिळणारे अतिशय बारीक धागे असतात. हे धागे वाळवल्यानंतर केसर तयार होतो. हा पीक प्रामुख्याने थंड हवामानात चांगला वाढतो. म्हणूनच काश्मीर, अफगाणिस्तान, स्पेन, ग्रीस, इटली आणि मोरोक्को यांसारख्या भागांमध्ये केसरची लागवड केली जाते.

घरच्या घरी केसर उगवण्यासाठी काय लागेल?

घरच्या घरी केसर उगवण्यासाठी फारशा गोष्टींची गरज नसते.

  • केसरचे चांगले, सुदृढ बल्ब (पल्प)
  • ट्रे
  • हलकी, भुसभुशीत आणि पाणी न साठणारी माती
  • उघडी पण सावलीची जागा
राणी अंशू यांच्या मते, मातीची गुणवत्ता आणि योग्य जागा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

घरच्या घरी केसर कसा उगवायचा?

  1. सर्वप्रथम ऑनलाइन नर्सरी किंवा गार्डन स्टोअरमधून केसरचे दर्जेदार बल्ब घ्यावेत. ते कोरडे, घट्ट आणि खराब नसावेत.
  2. माती नीट चाळून भुसभुशीत करावी. केसरला जास्त ओलावा मानवत नाही, त्यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
  3. गमल्यात बल्ब लावताना त्याचा नुकीला भाग वरच्या दिशेने ठेवावा. प्रत्येक बल्बमध्ये थोडे अंतर ठेवावे.
  4. अंकुर फुटेपर्यंत गमला थेट उन्हात न ठेवता सावलीत, पण मोकळ्या जागी ठेवावा.
  5. उंदीर किंवा माकडांपासून संरक्षणासाठी गमला जाळीने झाकावा.

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

योग्य काळजी घेतल्यास काही आठवड्यांतच केसरचे रोप उगवते. फुल येताच त्यातील बारीक धागे म्हणजेच केसर मिळतो. विशेष बाब म्हणजे हे बल्ब हळूहळू वाढत जातात, त्यामुळे पुढील हंगामात अधिक झाडे मिळू शकतात.

योग्य माहिती, संयम आणि काळजी घेतल्यास घरच्या घरी केसर उगवणे शक्य आहे. हे केवळ एक प्रयोग न राहता भविष्यात छोट्या प्रमाणात उत्पन्नाचाही स्रोत ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Web Title: How to cultivate a saffron plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 04:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.