(फोटो सौजन्य – istock)
रात्रीचे जड जेवण
अनेकदा रात्रीच्या वेळी आपण भरगच्च आहार घेतो. रात्रीच्या वेळी कधीही जड अन्न खाऊ नये यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अन्न व्यवस्थित पचत नाही. हेच कारण आहे की सकाळी उठताच पोट जड वाटू लागते.
अन्न न चावता गिळणे
अनेकांना अन्न न चावट पटकन गिळून टाकण्याची सवय असते. तुमची ही सवय अत्यंत चुकीची असून यामुळे शरीरात वायू निर्माण होण्याची शक्यता असते. कधीही अन्न हे व्यवस्थित चावून मग गिळावे.
तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न
तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न शरीरात चरबीचा थर जमा करते, ज्यामुळे पोटफुगी आणि गॅसची समस्या आणखीन वाढते.
पुरेसे पाणी न पिणे
शरीराला पाण्याची नितांत गरज असते. कमी पाणी पिल्याने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि गॅस तयार होतो. शिवाय यामुळे डिहायड्रेशनची समस्याही उद्भवते.
ताणतणाव असणे
मानसिक ताणाचा थेट परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो. चिंता पचनक्रियेत व्यत्यय आणते, ज्यामुळे गॅस वाढतो.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफ घेण्याच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल आतून स्वच्छ
गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे
काही असे पदार्थ जे शरीरात गॅस जमा करतात. हरभरा, राजमा, कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्या आणि डाळींचे सेवन सकाळी पोटफुगीची समस्या निर्माण करते. तुम्हाला दररोज पोट फुगण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर या गोष्टींचा विचार करा आणि आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






