१० मिनिटांमध्ये चविष्ट चीझ उत्त्पम
सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची चांगली ऊर्जा मिळते. सर्वच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. सकाळी केलेला नाश्ता हा पचनासाठी हलका आणि पोट भरेल असा असावा, जेणेकरून दुपारच्या जेवणापर्यंत शरीरात ऊर्जा टिकून राहील. पण काही लोक नाश्ता करणे टाळतात. नाश्त्यामध्ये आवडीचा पदार्थ नसेल तर नाश्ताच करत नाही. पण असे न करता सकाळचा नाश्ता केला पाहिजे. सकाळी नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चविष्ट चीझ उत्तपम कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नाश्त्यामध्ये चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटातील विषारी पदार्थांमुळे बिघडेल आरोग्य