Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यासाठी बनवा दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी झटपट तयार होणारे कांदेपोहे बनवले जातात. कांदेपोहे बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. पण रोज रोज तेच तेच कांदेपोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पोह्यांपासून दडपे पोहे बनवू शकता. १० मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2024 | 09:05 AM
१० मिनिटांमध्ये बनवा सोप्या पद्धतीमध्ये दडपे पोहे

१० मिनिटांमध्ये बनवा सोप्या पद्धतीमध्ये दडपे पोहे

Follow Us
Close
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी किंवा घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी झटपट तयार होणारे कांदेपोहे बनवले जातात. कांदेपोहे बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. पण रोज रोज तेच तेच कांदेपोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही पोह्यांपासून दडपे पोहे बनवू शकता. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. तसेच लहान मुलांसह घरातील मोठे व्यक्तीसुद्धा हे पोहे आवडीने खातील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यानंतर पोटही भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे नेहमी सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. सकाळी पोटभर नाश्ता केल्यानंतर दुपारी लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया दडपे पोहे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: श्रावण महिन्यात हिरव्या भाज्या का खाऊ नये?

साहित्य:

  • पोहे
  • शेंगदाणे
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • लिंबू

कृती: 

  • दडपे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे स्वच्छ करून घ्या. स्वच्छ करून घेतलेले पोहे पाण्यात भिजत ठेवा. पोह्यांमध्ये जास्त पाणी टाकू नये.
  • त्यानंतर पोहे भिजल्यावर पाणी काढून टाका. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर टाकून मिक्स करून घ्या.
    नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता टाकून मिक्स करा. नंतर त्यात हिरव्या
  • मिरच्या घालून व्यवथित परतून घ्या. फोडणी तयार झाल्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे टाका.
  • शेंगदाणे 5 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यात पोह्याचं मिश्रण टाकून चवीनुसार मीठ टाका. मंद आचेवर ५ मिनिटं ठेवून गॅस बंद करून घ्या.
  • पोहे तयार झाल्यानंतर वरून ओल्या खोबऱ्याचा किस टाका.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दडपे पोहे.

Web Title: How to make dadpe pohe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 09:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.