
फोटो सौजन्य - Social Media
ऋतू बदलताच हलकी थंडी जाणवू लागली आहे. या हंगामात वातावरण आनंददायी असलं तरी प्रतिकारशक्ती कमी होते आणि सर्दी, खोकला, ताप, त्वचेचे आजार, तसेच पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. अशा वेळी शरीराला पोषण आणि नैसर्गिक बळ देण्यासाठी आवळा-हळदीचा रस हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. आयुर्वेदानुसार आवळा आणि हळद हे दोन्ही घटक औषधी गुणांनी परिपूर्ण असून शरीराला आतून सशक्त करतात.
1. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो:
आवळ्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढवून इम्युनिटी मजबूत करते. हळदीतील कर्क्युमिन हे घटक बॅक्टेरिया आणि व्हायरसविरुद्ध लढण्यास मदत करते.
2. पचन सुधारतो:
हा रस पचनक्रिया सुरळीत ठेवतो. आवळा आम्लपित्त आणि वायू कमी करतो, तर हळद आतड्यांतील सूज कमी करते.
3. त्वचेला नैसर्गिक तेज देते:
या रसातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून त्वचा स्वच्छ आणि उजळ ठेवतात.
4. सर्दी-खोकल्यावर आराम:
आवळा आणि हळद या दोघांनाही जंतुनाशक गुणधर्म आहेत, जे गळ्याच्या खवखवीत आणि सर्दीत आराम देतात.
5. लिव्हर डिटॉक्स करते:
हा रस यकृत स्वच्छ करून त्याचे कार्य अधिक सक्षम करतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतो.
6. मधुमेहात उपयुक्त:
आवळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतो, तर हळद इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते.
7. केसांसाठी लाभदायक:
आवळा केसांना मुळापासून पोषण देतो, तर हळद टाळूला निरोगी ठेवते आणि केसगळती कमी करते.
हा रस सकाळी उपाशीपोटी पिणे सर्वाधिक फायदेशीर ठरते. आठवड्यातून ३-४ वेळा घेतल्यास संपूर्ण हिवाळ्यात शरीर ऊर्जावान, निरोगी आणि रोगांपासून सुरक्षित राहते.