जेवल्यानंतर लगेच करा 'या' औषधी पदार्थांचे सेवन, दातांच्या गंभीर समस्यांपासून मिळेल कायमचा आराम
दैनंदिन आहारात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत खाण्याची सवय असते. तिखट, तेलकट, आंबट किंवा जास्त मीठ असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. पण त्यासोबतच दातांच्या आरोग्य सुद्धा बिघडून जाते. दातांवर साचून राहिलेला पिवळा थर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो. याशिवाय तोंडातून येणारी दुर्गंधी, दात दुखणे, हिरड्यांना सूज येणे, दातांमध्ये वाढलेल्या तीव्र वेदना इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. दातांना कीड लागल्यानंतर संपूर्ण दात खराब होऊन जातो. त्यामुळे जेवणानंतर नियमित दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात स्वच्छ न केल्यास अन्नपदार्थांचे बारीक कण दातांमध्ये तसेच साचून राहतात. हे कण दातांमध्ये कुजल्यानंतर संपूर्ण दाताचे आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज चांगले ठेवण्यासाठी जेवल्यानंतर कोणत्या औषधी पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होईल.(फोटो सौजन्य – istock)
भारतीय मसाल्यांमधील अतिशय प्रभावी मसाल्याचा पदार्थ म्हणजे लवंग. तिखट चवीची लवंग जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. यामध्ये यूजेनॉल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे दातांमध्ये वाढलेल्या बॅक्टरीया कमी होऊन दातांचे आरोग्य सुधारते. दातदुखी आणि हिरड्यांमधील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन करावे. त्यामुळे जेवणानंतर नियमित एक लवंग चावून खाल्यास दातांच्या सर्वच समस्या कमी होतील.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप जास्त आवडतो. पेरूचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पेरूसोबतच पेरुची पाने सुद्धा अत्यंत प्रभावी आहेत. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होण्यासोबतच संपूर्ण शरीराचे कार्य सुधारते. पेरूच्या पानांमध्ये क्वेरसेटिन नावाचा घटक आढळून येतो. यामुळे हिरड्यांमध्ये वाढलेल्या वेदना आणि कीड नष्ट होण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कडुलिंबाच्या पानांचा वापर केल्यामुळे हिरड्याना लागलेली कीड नष्ट होऊन जाते आणि दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो. त्यामुळे जेवणानंतर कडुलिंबाच्या काठीने दात स्वच्छ करून घ्यावे.
दात आणि तोंडाची काळजी घेण्यासाठीच्या टिप्स?
दिवसातून दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. ब्रश करताना हिरड्यांच्या रेषेवर हळूवारपणे आणि काळजीपूर्वक ब्रश करा.तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी जीभ हलक्या हाताने ब्रश करा किंवा टंग स्क्रॅपरचा वापर करा.
दात दुखण्याची कारणे?
रोजच्या आहारात गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे दातांमध्ये वेदना वाढू लागतात. तसेच दातांना कीड सुद्धा लागते.






