फोटो सौजन्य - Social Media
कल्लाडका चहाला भारतामध्ये के चहा या नावानेही ओळखले जाते. कल्लाडका हे दक्षिण भारतातील ठिकाण असून राष्ट्रीय महामार्ग ७५ वर येत असल्याने बहुतेक प्रवासी विश्रांतीसाठी येथे थांबतात. लक्ष्मी निवास हॉटेल, जे KT हॉटेल या नावाने प्रसिद्ध आहे. हे हॉटेल खासकरून त्यांच्या चहा तसेच कॉफीसाठी नावाजले आहे. ही चहा इतर चहांपेक्षा जरा हटके आहे. या चहाची अनोखी बात म्हणजे एक पारदर्शक काच दुधावर ठेवलेल्या डेकोक्शनचे थर दर्शविते, हळूहळू फिरते परंतु दुधात मिसळत नाही. खऱ्या स्थानिक परंपरेत, काच नेहमीच्या लहान स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात ठेवली जाते आणि काचेच्या वर एक चमचा ठेवला जातो.
दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी चहा हमखास मिळून येते. परंतु, भारतात इतर ठिकाणी सही चहा शोधून सापडत नाही. पण जर तुम्हाला या चहाचिव स्वाद चाखायची इच्छा आहे तर कल्लाडकाची वाट धरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही घरच्या घरी बसून त्या चहाची स्वाद घेऊ शकता. आज या लेखातून आपण कल्लाडका चहा बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ कल्लाडका चहा बनवण्याची सोपी रेसिपी:
हे देखील वाचा : केसातील डँड्रफला दूर करण्यासाठी फायदेशीर; भेंडी खाण्याचे 5 फायदे
साहित्य:
2 कप दूध
2 टीस्पून चहा पावडर
1 टीस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त करा)
1/4 टीस्पून वेलची पावडर (ऐच्छिक)
1/2 कप पाणी
1/2 टीस्पून आले (ऐच्छिक)
1 टीस्पून कॉफी डेकोक्शन (किंवा फिल्टर कॉफी)
कृती:
प्रथम एका पातेल्यात पाणी घ्या आणि ते उकळायला ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात चहा पावडर घाला. त्यात आले आणि वेलची पावडर घालून काही मिनिटे उकळा. चहा पावडर आणि मसाल्यांचा स्वाद पाण्यात उतरू द्या. त्यानंतर, दुसऱ्या एका पातेल्यात दूध उकळा. दुधात साखर घालून ती चांगली मिसळून घ्या. उकळलेल्या चहाच्या मिश्रणात दुधाचे थर हळूहळू ओतून त्यात डेकोक्शन (कॉफी) घाला. चहाचे थर तयार करण्यासाठी, एक पारदर्शक काच किंवा ग्लास घ्या. प्रथम ग्लासमध्ये दुधाचे थर ओता आणि मग हळूहळू चहाचे मिश्रण घाला. यामुळे दूध आणि चहाचे थर स्पष्ट दिसतात आणि त्यांचा स्वाददेखील उठून येतो.
हे देखील वाचा : Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी
तयार झालेल्या चहावर चमचा ठेवा आणि काचेचा ग्लास स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात ठेवा. तुमचा पारंपरिक दक्षिण भारतीय “कल्लाडका” चहा तयार आहे. गरमागरम चहा चाखण्यास सज्ज व्हा! ही सोपी रेसिपी तुम्हाला घरच्या घरी “कल्लाडका” चहा बनवण्यास मदत करेल.