Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा

मटारपासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये मटार ढोकळा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या ढोकळा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 23, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा

सोप्या पद्धतीमध्ये बनवा मटार ढोकळा

Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळच्या वेळी आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहाने जातो. शिवाय शरीरात ऊर्जा निर्माण होते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे मटार उपलब्ध असतात. हिरवे मटार आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. मटारपासून मटार पुलाव, मटार भाजी, कटलेट, भजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला मटारचा वापर करून ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ढोकळा हा पदार्थ खायला खूप आवडतो. ढोकळा खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया मटार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • मटार
  • मीठ
  • बेसन
  • रवा
  • दही
  • हिरवी मिरची
  • आलं
  • फ्रूट सॉल्ट
  • लाल मिरची
  • मोहरी
  • हिंग
  • पांढरे तीळ
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मटार ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम, रवा, बेसन, चवीनुसार मीठ आणि दही मिक्स करून घ्या.
  • नंतर मिक्सरच्या भांड्यात मटार, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • पेस्ट तयार करून झाल्यानंतर रव्याच्या मिश्रणात मिक्स करा. त्यानंतर डब्यात तेल लावून त्यात तयार करून घेतलेले सारण ओतून सेट करून घ्या.
  • त्यानंतर टोपामध्ये किंवा कुकरच्या भांड्यात ढोकळा वाफवण्यासाठी ठेवा. 15 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी गरम करा.
  • ढोकळा थंड झाल्यानंतर त्यावर तयार केलेली फोडणी ओतून तुकडे करून घ्या. वरून पांढरे तीळ टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मटार ढोकळा.

Web Title: How to make matar dhokla at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.