Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत ‘पनीर पकोडो’ नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी

Paneer Pakora Recipe : तुम्हालाही कुरकुरीत स्नॅक्स खायला खूप आवडतात का? मग घरी पनीर भजींची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पनीरचे हे भजी चवीला अप्रतिम लागतात आणि फक्त १० मिनिटांत ते तयार होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 09:30 AM
Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत 'पनीर पकोडो' नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात घरी कुरकुरीत 'पनीर पकोडो' नाही बनवले मग काय केलंत? नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात अनेक प्रकारचे भजी घरी बनवले जातात.
  • अशात यंदा फक्त कांदाभजी नाही तर पनीर भजी देखील बनवून खा.
  • याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल.
पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम भजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. पारंपरिक कांदा, बटाटा किंवा मिरची भजी यांना पर्याय म्हणून पनीर भजी हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले पनीर भजी चवीला अतिशय रुचकर लागते. पनीरमधील प्रथिने आणि बेसनाच्या मसालेदार आवरणाचा मिलाफ या पदार्थाला एक वेगळीच चव देतो.

Recipe : घरच्या घरी बनवा ‘गार्लिक चीज पिझ्झा’; प्रत्येक घासात मिळेल आनंद

संध्याकाळच्या चहासोबत, पाहुण्यांसाठी झटपट नाश्ता म्हणून किंवा मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणून पनीर भजी उत्तम पर्याय ठरते. कमी वेळात आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून हा पदार्थ तयार करता येतो. गरमागरम पनीर भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलून येते. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २०० ग्रॅम पनीर
  • १ कप बेसन
  • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून धणे-जिरे पूड
  • चिमूटभर ओवा
  • मीठ चवीनुसार
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
Recipe : हाॅटेलसारखा टेस्टी ‘पनीर निर्वाणा’ बनवा घरीच, खास प्रसंगासाठी परफेक्ट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, ओवा आणि मीठ एकत्र करून त्यात थोडे-थोडे पाणी घालत घट्टसर पीठ तयार करा.
  • आता पनीरचे चौकोनी तुकडे करून हे तुकडे तयार पिठात चांगले बुडवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात पिठात बुडवलेले पनीरचे तुकडे सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • तळलेले भजी टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
  • गरमागरम पनीर भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.
  • खुसखुशीत आणि चविष्ट पनीर भजी पावसाळ्यातील संध्याकाळ अधिक खास बनवणारा एक उत्तम नाश्ता आहे.
 

Web Title: How to make paneer pakora at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Monsoon
  • paneer

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी
4

Recipe : व्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल टेस्टी पनीर बिर्याणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.