सोप्या पद्धतीमध्ये बनवा पनीर पॅनकेक
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं हेल्दी आणि टेस्टी नाश्ता हवा असतो. अनेक लोक सकाळचा नाश्ता बाहेरून विकत आणतात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत, जे आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी ठरतील. अनेकदा नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावे? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी महिलांना कमीत कमी वेळात तयार होणारा पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यामध्ये पनीर पॅनकेक बनवू शकता. पनीर आरोग्यासाठी हेल्दी असल्यामुळे अनेक लोक पनीरचे सेवन करतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खूप आवडते. त्यामुळे कमीत कमी वेळात तयार होणारे पनीर पॅनकेक नक्की बनवून पहा. चला तर जाणून घेऊया पनीर पॅनकेक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शिजविण्यापूर्वी डाळ पाण्यात का भिजवावी