
उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाणा रोल
देशासह राज्यभरात सगळीकडे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. नवरात्री उत्सवात सगळीकडे आनंद आणि चैतन्याचे वातावरण असते. या दिवसांमध्ये अनेक ठिकणी देवीची स्थापना करून विधिवत पूजा केली जाते. या दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. तसेच नऊ दिवस राज्यातील सर्वच ठिकाणी गरबा दांडियांचे आयोजन केले जाते. घटस्थानपनेच्या दिवसांपासून अनेक लोक उपवास करतात. या नऊ दिवसांच्या उपवसामध्ये कोणत्याही मांसाहारी पदार्थाचे सेवन केले जात नाही. या उपवासाच्या दिवसांमध्ये फक्त साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी इत्यादी उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुमच्यासह घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)