सोनपापडी खीर बनवण्याची सोपी रेसिपी
देशभरात सगळीकडे दिवाळी उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात पार पडला. दिवाळीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये नवीन कपडे, मिठाईचे गोड, फराळ इतर अनेक गोष्टी केल्या जातात. तसेच दिवाळीमध्ये पाहुण्यांची रेलचेल घरी चालू असते. घरी पाहुणे आल्यानंतर काहींना काही गोड पदार्थ घेऊन येतात. त्यात आवर्जून आणला जाणारा पदार्थ म्हणजे सोनपापडी.दिवाळीमध्ये पाहुणे घरी आल्यानंतर मिठाईच्या पदार्थांमध्ये सोनपापडी आणली जाते. सोनपापडी चवीला गोड असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सोनपापडी हा पदार्थ आवडतात. पण तेच तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर गोड पदार्थ नकोसे वाटतात.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आता घरीच बनवा, व्हायरल होतेय रेसिपी, त्वरित नोट करा
घरी आणलेल्या मिठाईच्या पदार्थांमधील सोनपापडीचे नेमके काय करावे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोनपापडीपासून खीर बनवू शकता. खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आत्तापर्यंत तुम्ही तांदुळाची खीर, साबुदाणा खीर किंवा रव्याची खीर खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला सोनपापडी खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली सोनपापडी खीर सगळेच आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया सोनपापडी खीर बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: सर्व भाज्यांवर भारी पडेल हे आलं-लसूण-मिरचीचं लोणचं! लगेच रेसिपी नोट करा