Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झटपट झोप येण्यासाठी सोपी टेक्निक: औषधांशिवाय शांत झोपेचा सोपा मार्ग

आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल, ताणतणाव आणि अनियमित दिनक्रमामुळे अनेकांना झोप न येण्याची समस्या भेडसावत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 28, 2025 | 08:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ही पद्धत कोणतेही औषध न घेता मन आणि शरीर शांत करण्यास मदत करते
  • उशीवर आरामात पाठ टेकून झोपावे
  • झटपट झोप येण्यासाठी डोळ्यांची एक सोपी एक्सरसाइज
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोप न येण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. सतत मोबाईलचा वापर, कामाचा ताण, मानसिक अस्वस्थता आणि अनियमित दिनक्रम यामुळे झोपेचे चक्र बिघडत आहे. परिणामी सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड वाढते आणि दीर्घकाळात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. झोप येण्यासाठी अनेक जण औषधांचा आधार घेतात किंवा महागडे उपचार करतात. मात्र, याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अदाह शर्मा हिने एक अतिशय सोपी, नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येणारी टेक्निक सांगितली आहे.

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का

अदाह शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झटपट झोप येण्यासाठी डोळ्यांची एक सोपी एक्सरसाइज दाखवली आहे. ही पद्धत कोणतेही औषध न घेता मन आणि शरीर शांत करण्यास मदत करते. ही टेक्निक वापरण्यापूर्वी मोबाईल फोन सायलेंट किंवा फ्लाइट मोडवर ठेवावा, जेणेकरून कोणताही व्यत्यय येणार नाही. त्यानंतर उशीवर आरामात पाठ टेकून झोपावे आणि डोळे बंद करावेत. संपूर्ण लक्ष फक्त डोळ्यांच्या हालचालींवर केंद्रित करायचे आहे.

डोळ्यांची एक्सरसाइज कशी करावी?

  • सर्वप्रथम डोळे डावीकडे (लेफ्ट), मग मध्यभागी (सेंटर), त्यानंतर उजवीकडे (राईट) आणि पुन्हा सेंटरकडे घ्या.
  • यानंतर डोळे वर (अप), मग सेंटर, खाली (डाउन) आणि पुन्हा सेंटरकडे आणा.
  • तिसऱ्या टप्प्यात नाकावर लक्ष केंद्रित करा आणि डोळे घड्याळाच्या दिशेने (क्लॉकवाइज) गोल फिरवा.
  • यानंतर डोळे उलट दिशेने (अँटी-क्लॉकवाइज) गोल फिरवा.
  • ही संपूर्ण प्रक्रिया दोन ते तीन वेळा करा. काही वेळातच डोळे जड होऊ लागतात आणि झोप येण्यास सुरुवात होते.
अदाह शर्माच्या मते, प्रत्येक व्यक्तीला लगेच झोप येईलच असे नाही, पण ही प्रक्रिया काही वेळा केल्यास नक्कीच फायदा होतो. डोळे आणि श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार, ताणतणाव आणि चिंता हळूहळू कमी होतात. ही पद्धत ध्यान (मेडिटेशन) आणि रिलॅक्सेशनसारखी काम करते, ज्यामुळे मेंदू शांत होतो आणि शरीर झोपेसाठी तयार होते.

Health Care : हिवाळ्यात तोंड झाकून झोपताय? आजच मोडा सवय अन्यथा यमदेवाला तुमचा पत्ता लागलाच म्हणून समजा

दररोज कसे करावे?

  • झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे ही एक्सरसाइज करा.
  • रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणे टाळा.
  • खोलीत मंद प्रकाश आणि शांत वातावरण ठेवा.
  • दररोज नियमित सराव केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते.
ही सोपी टेक्निक नियमितपणे केल्यास नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत होते आणि शरीर-मन दोन्ही ताजेतवाने राहते.

Web Title: How to sleep without medicine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • Medicines Issue
  • sleep problems

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.