फोटो सौजन्य - Social Media
नाते तेव्हाच खरे जेव्हा नात्यात प्रेम असते. पण कधी कधी नात्यात प्रेम भरपूर असते, पण काही कारणामुळे एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे व्यक्ती दुरावतात. हा दुरावा काही काळासाठी असतो तर कधी कधी हा दुरावा कायमचा! दोघांना प्रेम आहे पण ते कारण या दोघांना एकमेकांना एकमेकांपासून दूर करतात. हे कारण म्हणजे गैरसमज! कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू दुसरं तिसरं कुणी नसतं तर तो असतो गैरसमज! नात्यात भांडणे होत असतात आणि ते बऱ्यापैकी असावे. माणूस त्याच्याशीच भांडतो ज्याला तो आपला मानतो. जर तुमचा पार्टनर तुमच्याशी भांडला असेल तर वाईट मानून नका घेऊ, त्यापेक्षा त्याला समजून घ्या. पण सतत भांडणे असेल तर विचार करा. तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्याशी भांडतोही प्रेमाने!
नात्यामध्ये मज्जाही असलीच पाहिजे. जर तुमचा पार्टनर तुम्हाला मजेत काही चिडवत असेल तर तो निव्वळ तुमच्याशी मस्ती करतो. आता त्याच्याकडे मस्ती करण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्याशिवाय असतो कोण? मग तो त्याचे हसवे फुगवे तुमच्याशीच शेअर करतो. पण कधी कधी आपण या मस्तीची गैरसमज करून घेतो आणि आपल्या पार्टनरवर रागावतो, रुसतो आणि त्याला टाळतो. यात चुकी ना तुमची असते ना त्याची असते, यात चुकी असते दुराव्याच्या कारणाची, ते कारण म्हणजेच गैरसमज! गैरसमजामुळे नाते बिघडते तर कधी कधी तुटतेदेखील त्यामुळे याला टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न होणे गरजेचे असते. गैरसमज असेल तर बोलणे टाळण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन चर्चा करा. या गैरसमजाला दूर करण्यासाठी प्रयत्न करा आणि नाते वाचवा, कारण जेव्हा आपला व्यक्ती आपल्यावर रुसतो आणि टाळतो तेव्हा होणाऱ्या वेदना फार गंभीर असतात.
गैरसमज सोडवण्यासाठी संवाद असणे महत्वाचे आहे. Call किंवा Chat पेक्षा, एकमेकांना भेटून हा संवाद होणे गरजेचे आहे. कारण Chat वर व्यक्तीचे हावभाव आणि भावना कळून येत नाहीत, त्यामुळे व्यक्ती सांगतो एक आणि समोरील व्यक्ती समजतो एक असा प्रकार घडत असतो आणि गैरसमज होतो. Chat किंवा Call वर केलेली मज्जा मस्तीही पुढे जाऊन गैरसमजाचा कारण बनू शकते. त्यामुळे भेटून यावर चर्चा करा. एकमेकांवर विश्वास ठेवा. नात्यात बदल महत्वाचा असतो. चुकांची पुनरावृत्ती नको असते. पण एखाद्याने त्या चुका मान्य केल्या आणि हजारदा तुमच्याकडे माफी मागितली तर त्याला समजून घ्या. प्रत्येकजण माफी मागत नाही, जो तुम्हाला महत्व देतो तोच तुमची माफी मागतो. जर एखादा तुमची वारंवार माफी मागत असेल तर तो खरंच मनापासून मागत असतो, त्याला तुम्ही हवा असता.
आपल्याला आपल्या जोडीदाराबाबत काही गैरसमज झाले असतील. तर बोलणे टाळण्यापेक्षा त्या समजून घ्या आणि सोडवून लावा. कारण कधी कधी एकाला बोलायचे एक असते आणि समोरचा ऐकतो एक! अशाने कारण नसतानाही नाते बिघडते. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती नशीबाने मिळते, नात्यात दोघांना एकमेकांची गरज असते. जर गैरसमज होऊन समोरील व्यक्ती आपली माफी मागत असेल म्हणजे तो तुम्हाला अतिशय महत्व देतो आणि तुम्हाला गमावण्यापासून घाबरतो. त्यामुळे गैरसमज झाले तर त्यांना संवादाने टाळा आणि नात्याला वाचावा!