Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work From Home Health Tips: वर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या खास टिप्स

Work From Home Health Tips: वर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य बसण्याची पद्धत, नियमित ब्रेक, डोळ्यांची काळजी, पुरेसे पाणी आणि संतुलित आहार यांसारख्या सोप्या सवयींमुळे घरून काम करताना निरोगी राहण्यास मदत होते.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 12:51 PM
How to take care of your health while working from home? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

How to take care of your health while working from home? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वर्क फ्रॉम होम करताना योग्य बसण्याची पद्धत, नियमित ब्रेक आणि डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • घरून काम करताना पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्या.
  • कामासाठी स्वतंत्र जागा तयार करा आणि शारीरिक हालचालींसाठी वेळ काढा.

कोरोना महामारीनंतर वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची पद्धत अनेक कंपन्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. घरातून काम करण्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि कामात लवचिकता मिळते. मात्र, सतत एकाच ठिकाणी बसून काम करणे, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली कमी होणे यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरून काम करताना आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.(Work From Home Health Tips)

१. कामासाठी स्वतंत्र जागा तयार करा .

घरातून काम करताना शक्यतो शांत आणि हवेशीर जागा निवडा. कामासाठी टेबल आणि खुर्चीचा वापर करा. बेडवर किंवा सोफ्यावर बसून सतत काम करणे टाळा. यामुळे शरीराची स्थिती योग्य राहण्यास मदत होते.कामासाठी एक स्वतंत्र जागा ठेवा. ज्यामुळे तुम्हाला काम करताना अडथळे येणार नाहीत. त्यामुळे कामाला देखील गती येईल आणि तुमचे रोजचे काम सुरळीत होईल. काम करताना लागण्याच्या गोष्टी देखील जवळ ठेवा ज्यामुळे तुम्हाला सारखे वस्तू घेण्यासाठी उठावे लागणार नाही

२. बसण्याची योग्य पद्धत ठेवा .

योग्य बसण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या पाटीवर ताण येणार नाही. तसेच शरीराची योग्य ठेवणं देखील सतत चुकीचे बसल्यामुळे बदलू शकते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरताना पाठ सरळ ठेवा. पाय जमिनीवर टेकतील अशा पद्धतीने बसा. स्क्रीन डोळ्यांच्या समोरच्या उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे मान आणि पाठीवरील ताण कमी होऊ शकतो.

Lifestyle: आनंदी राहण्यासाठी रोज स्वतःसाठी करा ‘या’ ७ गोष्टी

३. नियमित ब्रेक घ्या.

सतत एकाच जागी बसून काम केल्यामुळे पाठदुखी, मानदुखी आणि स्नायूंचा ताण जाणवू शकतो.तसेच आपले शरीर आखडते. आपले स्नायू आकुंचन पावतात. दर ३० ते ६० मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या. ज्यामुळे तूमचे हलके होईल आणि स्नायू मोकळे होतील. उठून चाला आणि हलके स्ट्रेचिंग करा.

४. डोळ्यांची काळजी घ्या.

लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवू शकतो.तसेच चष्मा असल्यास त्याचा वापर करा ज्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येणार नाही.आणि कॉम्पुटर पासून येणाऱ्या किरणांमुळे तुमच्या डोळ्यांची निगा राखली जाईल. २०-२०-२० हा नियम वापरून पाहा. दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी सुमारे २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहा.

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

५. पुरेसे पाणी प्या.

कामाच्या गडबडीत अनेकजण पाणी पिणे विसरतात.पाणी कमी पिण्यामुळे डिहायड्रेशन चा त्रास होतो त्यामुळे आपल्या जवळच पाण्याची बाटली ठेवा. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. कामाच्या टेबलावर पाण्याची बाटली ठेवा आणि दिवसभर पुरेसे पाणी प्या.

६. संतुलित आहार घ्या .

काम करताना सतत चहा, कॉफी किंवा जंक फूड खाण्याची सवय टाळा. घराचं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आहारात फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.आपल्या आहाराकडे दुर्लक्ष्य करू नका, जेवणाची एक योग्य वेळ निवडा. अवेळी जेवल्यामुळे देखील त्रास शरीराला होऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वर्क फ्रॉम होम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

    Ans: वर्क फ्रॉम होम करताना योग्य बसण्याची पद्धत ठेवा, नियमित ब्रेक घ्या, डोळ्यांना विश्रांती द्या, पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या.

  • Que: घरून काम करताना किती वेळाने ब्रेक घ्यावा?

    Ans: दर ३० ते ६० मिनिटांनी थोडा ब्रेक घेऊन उठून चालावे किंवा हलके स्ट्रेचिंग करावे. यामुळे शरीरावरील ताण कमी करण्यास मदत होते.

  • Que: वर्क फ्रॉम होम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

    Ans: २०-२०-२० नियमाचा वापर करा. दर २० मिनिटांनी सुमारे २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे २० सेकंद पाहा. तसेच स्क्रीनचा ब्राइटनेस योग्य ठेवा आणि डोळ्यांना नियमित विश्रांती द्या.

Web Title: How to take care of your health while working from home sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • office work
  • Work From Home
  • Work life balance

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.