Do these 7 things for yourself every day to stay happy(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आजच्या धावपळीच्या जीवनात काम, घर, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकजण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. दिवसभर इतरांसाठी वेळ काढताना स्वतःच्या आवडी-निवडी आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे विसरतात. मात्र, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजच्या दिनक्रमात काही छोट्या सवयींचा समावेश केल्यास मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते.(Lifestyle)
सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहण्याऐवजी काही मिनिटे शांत बसा. आजचा दिवस चांगला जाणार आहे, असा सकारात्मक विचार मनात आणा.त्याबरोबर स्वतःसाठी ठराविक वेळ बाजूला काढून त्यामध्ये कोणतीही गोष्ट ना करता तुमच्या शरीराला आराम द्या. दिवसाची सुरवात एकदा प्रसन्नतेने झाली की पुढचा दिवस हा उत्तमपाने पार पडतो.
रोज काही वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी द्या. पुस्तक वाचणे, चित्र काढणे, गाणी ऐकणे, नृत्य करणे किंवा बागकाम करणे अशा छंदांमुळे मनाला आनंद मिळतो.तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात ते जाणून घ्या.अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल. त्यामुळे तुम्हाला उत्साह मिळेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.छंद जोपासल्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातले काम देखील सोप्पे वाटू लागेल. आणि तुमच्या कामाला चालना मिळेल.
शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम महत्त्वाचा आहे.रोजच्या जीवनात कामावर जाऊन एकाच ठिकाणी बसल्यामुळे शरीराला चालना मिळत नाही तर शरीर अजूनच आळशी बनत जाते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील व्यायाम करू शकता.त्यासाठी रोज किमान २० ते ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि मूड सुधारण्यास मदत होते.
अनेकदा आपण केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. दिवसभरात पूर्ण केलेल्या छोट्या कामांचेही कौतुक करा.त्यासाठी स्वतःला भेट द्या,तुम्हाला आवडतील अशा गोष्टी करा, ज्याने तुमचा अमान प्रसन्न राहील. स्वतःच्या प्रगतीची जाणीव ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो.
मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारा. तुमच्या दैनंदिन जीवनात झालेल्या गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.ज्याने तुमचे मन हलके होईल.आपल्या भावना व्यक्त केल्याने मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.
सतत काम करत राहिल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो.कोठेतरी फिरायला जाणे ,कुटुंबियांशी वेल घालवणे, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडा ब्रेक घ्या. आवडता चहा प्या, संगीत ऐका किंवा काही वेळ शांत बसा.
आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. रोज ठरावीक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा.
आनंदी राहण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. स्वतःसाठी केलेले छोटे प्रयत्नही जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. त्यामुळे इतरांची काळजी घेण्यासोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Ans: दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणे, आवडीचे छंद जोपासणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे यांसारख्या सवयी आनंदी राहण्यास मदत करू शकतात.
Ans: स्वतःसाठी वेळ काढल्यामुळे मनाला विश्रांती मिळते, ताण कमी करण्यास मदत होते आणि स्वतःच्या आवडी-निवडींकडे लक्ष देता येते.
Ans: नियमित व्यायाम, ध्यान, सकारात्मक विचार, पुरेशी झोप आणि जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद या गोष्टी मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.






