पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉन कमतरता असल्याने काय होते
टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हे एक पुरुष लैंगिक संप्रेरक आहे, जे पुरुषाच्या लैंगिक इच्छेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शुक्राणू निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन दिसण्याशिवाय जांघेवरील केस, चेहऱ्यावरील केसांपासून ते त्यांचा आवाज विकसित करण्यापर्यंत हे बदल घडवून आणतात.
टेस्टोस्टेरॉनची कमतरता असेल तर विवाहित पुरुषांना वडील होण्यात अडचणी येतात. यासाठी जेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते तेव्हा त्याची लक्षणे लवकरात लवकर ओळखून उपचार केले पाहिजेत, जेणेकरून नंतर नुकसान सहन करावे लागणार नाही. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत काही लक्षणे सांगितली असून ती प्रत्येक पुरुषाला माहीत असायला हवीत (फोटो सौजन्य – iStock)
शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होणे
टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यास शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही
जेव्हा पुरूषांची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते, तेव्हा तुमची शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जी इच्छा असते तीदेखील हळूहळू कमी होऊ लागते, हे एक सामान्य लक्षण आहे आणि ते पटकन ओळखले जाऊ शकते. याचा अर्थ असा की तुमच्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवण्याकडे तुमचा कल कमी असेल किंवा तुम्हाला आकर्षणाचा अभाव जाणवेल.
हेदेखील वाचा – पुरूषांच्या 5 वाईट सवयींमुळे लहान होतो प्रायव्हेट पार्ट, या चुका कधीच करू नका
इरेक्शनसाठी त्रास होणे
पुरुषांना अत्यंत त्रास होऊ शकतो
टेस्टोस्टेरॉन पुरुषांचे लिंग ताठरता प्राप्त करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करते, म्हणूनच जेव्हा पुरुषाच्या शरीरात या हार्मोनची कमतरता असते तेव्हा ते इरेक्टाइल डिसफंक्शनची तक्रार करतात, अशा परिस्थितीत लैंगिक संबंध ठेवणे कोणत्याही पुरुषासाठी अत्यंत कठीण होते आणि त्रासही सहन करावा लागतो.
हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
लिंगाचा आकार कमी होणे
टेस्टेस्टेरॉनच्या कमतरतेमुळे सर्वाधिक होणारा त्रास
जेव्हा पुरुषाच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते तेव्हा लिंगाचा आकारही कमी होऊ लागतो. हे अत्यंत धोकादायक लक्षण आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. काही पुरुषांना या गोष्टीची लाज वाटते आणि त्यामुळे डॉक्टरांकडे जाणेही ते टाळतात. लाजिरवाणेपणामुळे अनेकांना या समस्येवर उपचार मिळत नाहीत, परंतु जेव्हा त्यांना ही लक्षणे दिसतात तेव्हा त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.
कमकुवत स्नायू
टेस्टोस्टेरॉन हार्मोन केवळ पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठीच महत्त्वाचे नाही तर ते त्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासही मदत करते. जेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, तेव्हा बरेच ऊतक तुटणे सुरू होते. याचा परिणाम नवीन स्नायूंच्या निर्मितीवर होतो. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कमी वयातच सांधेदुखी आणि इतर आजारांना पुरूष बळी पडू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.