पुरूषांमधील वंध्यत्वाची समस्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, विकसनशील देशांमधील चारपैकी एका जोडप्याला वंध्यत्वाचा त्रास भेडसावतो. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार भारतातील वंध्यत्वाचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे आणि त्यातील ४० टक्के पुरूषांमधील वंध्यत्व आहे.
डॉक्टरांना भारतात मागील दशकभरामध्ये पुरूषांमधील वंध्यत्व मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन (आयएसएआर)नुसार, भारतातील सुमारे १०-१४ टक्के जोडपी वंध्यत्वाने ग्रस्त आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वंध्यत्व फक्त महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही वाढू लागले आहे. मात्र याचा ताण आणि भार कायम फक्त महिलांवर असतो. त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या मोठ्या प्रमाणावरील पुरूषांमध्ये हे सायलेंट आहे. त्यांना योग्य ती काळजी आणि उपचार मिळत नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये वंध्यत्वामुळे जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळण्यापासून वंचित राहण्याची गरज नसते तरीही हे होते. (फोटो सौजन्य – iStock)
वंध्यत्वाची कारणे
काय आहेत वंधत्वाची कारणे
वंध्यत्वाची कारणे अनेक आहेत. ती पुरूष आणि महिला पुनरूत्पादन यंत्रणांना बाधित करतात. यात असलेले घटक म्हणजे ब्लॉकेजमुळे पुनरूत्पादन मार्गांमधील अडथळे (इजॅक्युलेटरी डक्ट्स आणि सेमिनल व्हेसिकल्स). त्यामुळे वीर्य बाहेर पडण्यात अडचणी येतात, पिट्युटरी ग्रंथी हायपोथेलेमस आणि टेस्टिकल्सनी निर्माण केलेल्या हार्मोन्समध्ये हार्मोन्सचे असंतुलन किंवा टेस्टिकल्सना स्पर्म निर्मिती पेशींवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीमुळे स्पर्म निर्मिती करण्यात येणारे अपयश, तसेच स्पर्मचा अनियमित आकार किंवा दर्जा ज्यामुळे त्याच्या रचनेवर आणि हालचालींना बाधा येते. त्यामुळे स्त्रियांमधील बीजाला पुनरूत्पादनासाठी तयार करणे शक्य होत नाही.
स्पर्मचा दर्जा
तसेच जोडपी आपले शिक्षण आणि करियर यांना प्राधान्य देत असल्यामुळे लग्नाचे वय वाढू लागले आहे. अनेक पुरूष आणि स्त्रिया आता आपल्या तिशीच्या मधल्या किंवा शेवटच्या टप्प्यात लग्न करतात. त्यामुळे पालकत्वाला विलंब होतो. पुरूषांचे वय वाढते तसे त्यांच्या स्पर्मचा दर्जाही कमी होतो. त्यामुळे जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण जाते. याशिवाय पुरूषांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य समस्या भेडसावतात. त्यामुळे वंध्यत्वात भर पडते. ताणतणाव, लठ्ठपणा, वृषणाला गंभीर दुखापत किंवा दीर्घकाळ वृषण खूप जास्त गरम होणे अशा विविध समस्या आहेत. वंध्यत्वाच्या समस्या मद्यपान किंवा तंबाखूसारख्या व्यसनांमुळेही वाढू शकतात.
खुलेपणाने कमी चर्चा
वंध्यत्वाबाबत चर्चा होणे गरजेचे
डॉ. केदार गानला, इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट, अंकूर फर्टिलिटी, मुंबई, “पुरूषांमधील वंध्यत्वाबाबत अनेक समाजांमध्ये बहिष्कृतीकरणाच्या भीतीमुळे खुलेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळे अनेक पुरूषांना वैद्यकीय उपचार स्वतःसाठी घेऊन आपल्या जोडीदाराला गर्भवती करण्याबाबत काहीच माहीत नसते. वैद्यकीय विज्ञानाने मागील दोन दशकांमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्यामुळे पुरूषांमधील वंध्यत्वावरील उपचारांचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत आणि त्यातून इंट्रासायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) सारख्या प्रभावी औषधे आणि अद्ययावत असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह तंत्रज्ञान (एआरटी) सहजपणे उपलब्ध होतात.
कशी होते मदत
आयसीएसआयमध्ये स्पर्मची हालचाल, संख्या आणि दर्जा यांच्याबाबत समस्या असल्यास स्पर्मची पेशी बीजात थेट इंजेक्ट केली जाते. आयसीएसआय ही इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्राचा प्रकार आहे. त्यातून गर्भधारणेच्या नैसर्गिक पद्धतींमध्ये अडथळे येणाऱ्या जोडप्यांना मदत केली जाते. जोडप्यांचे लग्न तिशीच्या शेवटी झाले असल्यास त्यांना कुटुंब नियोजनासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन फायदा मिळतो. योग्य त्या मार्गदर्शनामुळे त्यांना आपले पुनरूत्पादन आरोग्य सुधारण्यासाठी योग्य ते पर्याय निवडण्यास मदत होते.”
जागरूकता महत्त्वाची
हा स्टिग्मा प्रामुख्याने लहान शहरे आणि गावांमध्ये आहे. इथे कुटुंबं अत्यंत घट्ट बांधलेल्या समाजात राहतात आणि त्यामुळे पुरूष तसेच त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या वंध्यत्वाची समस्या माहीत झाल्यास समाजाकडून केल्या जाणाऱ्या बहिष्काराची किंवा सामाजिक स्थान खालावण्याची शक्यता यांची भीती वाटते. लहान शहरांमध्ये त्या भोवती असलेला कलंक कमी करण्यासाठी शैक्षणिक जागृती कार्यक्रम आयोजित करण्याची गरज वाढू लागली आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्सेस असलेले स्पेशलाइज्ड फर्टिलिटी क्लिनिक्स ही काळाची गरज आहे, कारण त्यातून तज्ज्ञ व सेवेपासून वंचित लोक जवळ येऊ शकतील. वंध्यत्वाचा तज्ज्ञ म्हणून डॉक्टरांचे कर्तव्य जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाच्या मार्गावर मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांच्या अडथळ्यावर सर्वोत्तम उपाययोजना शोधून देण्याचे आहे.