HMPV व्हायरस म्हणजे काय?
2019 साली जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. या विषाणूमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. कोरोना विषाणूचे रुग्ण जगभरात सगळीकडे झपाट्याने पसरले होते. मात्र पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चीनमध्ये एका नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. हा विषाणू सगळीकडे वेगाने पसरत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणू पसरल्यामुळे रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा आहेत. शिवाय पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे चीनमध्ये पसरला हा नवीन विषाणू जगभरात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस असे असून यामुळे सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसून आली आहेत. शिवाय हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून आला आहे. २ वर्षांच्या खालील मुलांना या विषाणूचा सार्वधिक त्रास आहे. (फोटो सौजन्य – iStock)
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस हा नवीन विषाणू Pneumoviridae कुटुंबातील आहे. तसेच २००१ साली सगळ्यात आधी डच मधील संशोधकांनी या विषाणूचा पहिल्यांदा शोध लावला होता. हा विषाणू खोकला आणि शिंकल्यामुळे सगळीकडे पसरवतो. शिवाय या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाला मोठा फटका बसला होता.या नव्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या श्वसनमार्गावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खोकताना आणि शिंकण्याने निर्माण होणाऱ्या थेंबांद्वारे हा नवीन विषाणू पसरवू शकतो. तसेच हिवाळा असल्यामुळे या विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.
सर्दी खोकला, ताप, नाक बंद होणे, घशात घरघर होणे, इत्यादी लक्षणे समोर आली आहेत. या आजाराची लागण झाल्यामुळे चीनमध्ये काही ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. नवीन आलेला विषाणू खोकल्यामुळे आणि शिंकण्याने अनेक ठिकाणी पसरण्याचा धोका आहे. शिवाय या विषाणूचा प्रभाव अधिक वाढल्यामुळे न्यूमोनिसुद्धा होऊ शकतो. शिवाय इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -19 इत्यादी आजाराचे रुग्ण चीनमध्ये वाढत आहेत.
2019 मध्ये चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू वेगाने पसरला होता. त्यावेळी हा विषाणू न्यूमोनिया असल्याचे समजले होते. SARS-CoV-2 विषाणूद्वारे कोरोना विषाणू जगभरात सगळीकडे पसरला. भारतासह इतर देशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. यामध्ये 70 लाखांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.