कोकणातल्या 'या' गावात तीन दिवसांसाठी असतो भुतांचा सावट. (फोटो सौजन्य - Social Media)
चिंदर गाव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात स्थित आहे. या गावात आगळीवेगळी परंपरा पाहण्यास मिळते.
या गावामध्ये गावकरी तीन दिवस त्यांचे गाव भुतांच्या हवाले करतात. तीन दिवसांसाठी चिंदर गावाचे गावकरी गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर निवाऱ्यासाठी जातात.
या दरम्यान जो कुणी व्यक्ती या तीन दिवसांसाठी या गावामध्ये वास्तव्य करतो, त्याची खैर नसते. माणसं सोडा अगदी पशुवर्गही या तीन दिवसांसाठी खाली केले जाते.
असे म्हंटले जाते की या गावात देव आणि भूतामध्ये करार झाला होता. त्यावेळी देवाने ३ दिवसांसाठी या गावात भुतांना मुक्त संचार करण्याची परवानगी देवाने दिली.
तेव्हापासून आजपर्यंत वर्षातील हे ३ दिवस गावकरी आजही गाव रिकामे करून दुसरीकडे स्थलांतरित होतात.