लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या सवयींमुळे शरीरातील अवयवांवर अतिरिक्त तणाव येतो. अचानक वाढलेले वजन, थकवा, अशक्तपणा किंवा पाय सुजणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. शरीरातील महत्वाचे अवयव कमकुवत झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होते, ज्यामुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हर ३ महिन्यात मुळांपासून नष्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आहारात तिखट, अतितेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाल्यामुळे लिव्हरमधील अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात ताज्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, फळे आणि सुका मेव्याचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीर कायमच हेल्दी राहील. याशिवाय लिव्हरमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी बीटच्या रसाचे किंवा आल्याच्या रसाचे उपाशी पोटी सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ होईल.
सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम, ध्यान आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. काहींना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. पण असे न करता जेवल्यानंतर २ ते ३ तासानंतर झोपावे. यामुळे शरीरातील अन्नपदार्थ पचन होतात. शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर लिव्हरला हानी पोहचते. लिव्हरमध्ये साचलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करावा. सूर्यनमस्कार, कपालभाती यांसारखे प्राणायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीर स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या डिटॉक्स पेयांचे सेवन करतात. मात्र बाजारातील कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी त्रिफळा, कालमेघ आणि भूमी आवळा इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेल्या पावडरचे सेवन करावे. कोमट पाण्यात पावडर मिक्स करून उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल.
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
जेव्हा तुमच्या यकृतामध्ये (liver) जास्त प्रमाणात चरबी जमा होते, तेव्हा या स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात.निरोगी यकृतामध्ये चरबीचे प्रमाण खूपच कमी असते.
फॅटी लिव्हरची कारणे कोणती?
अति मद्यपान केल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होऊ शकते. : जास्त साखरेचे पदार्थ, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणे हे यकृतामध्ये चरबी जमा होण्याचे कारण ठरू शकते.
फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?
थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होणे.काहीवेळा कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत.