लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
मानवी शरीरातील सर्वच अवयव दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. शरीरातील एका अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी लिव्हर महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय पचन, हार्मोन्स संतुलन आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी लिव्हर मदत करते. पण दैनंदिन आहारात जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे किंवा धूम्रपान, दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यानंतर शरीरासाबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांना सूज येते. कारण शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे पायांचे घोटे आणि बोटांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. पायांना सूज आल्यानंतर सामान्य समस्या समजून दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पायांना सतत खाज येते. लिव्हरच्या आजाराचा परिणाम पित्तप्रवाहावर होतो, ज्यामुळे शरीरात पित्त क्षार जमा होतात. शरीरात जमा झालेल्या पित्तामुळे त्वचेला खाज येणे, रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात जमा झालेले पित्त कमी करण्यासाठी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे.
लिव्हरच्या पेशींना हानी पोहचण्यास सुरुवात झाल्यानंतर पायांमध्ये वेदना आणि जडपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे जडपणा, सुन्नपणा किंवा पाय दुखणे इत्यादी समस्या उद्भवतात.
घामाच्या दुर्गंधीमुळे अंगाला सतत खाज येते? ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम,खाजेपासून मिळेल सुटका
लिव्हर खराब झाल्यानंतर बिलीरुबिनची प्रक्रिया योग्य प्रमाणात होत नाही. बिलीरुबिन शरीरात वाढल्यामुळे हातापायांची त्वचा पिवळी पडण्यास सुरुवात होते. पायांच्या त्वचेवरही पिवळेपणा स्पष्टपणे दिसून येतो.
यकृत नुकसान म्हणजे काय?
यकृत हे शरीरातील महत्त्वाचे अवयव आहे, जे रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते.जेव्हा यकृताला हानी पोहोचते किंवा यकृताचे कार्य व्यवस्थित होत नाही, तेव्हा त्याला यकृत नुकसान म्हणतात.
यकृताच्या नुकसानीची कारणे:
जास्त मद्यपान करणे यकृतासाठी हानिकारक आहे. जास्त वजन असल्यास यकृतावर चरबी जमा होऊ शकते, ज्यामुळे नुकसान होते. हेपेटायटीस (Hepatitis) सारखे विषाणू यकृताला संक्रमित करून नुकसान पोहोचवू शकतात.
यकृताच्या नुकसानीची लक्षणे:
थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे. पोटात सूज येणे किंवा पाणी जमा होणे. शरीराला सहजपणे जखम होणे किंवा रक्तस्त्राव होणे.