दारू पिऊन सडलेले Liver पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. त्यामुळे लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते लिव्हर शरीरासाठी ५० पेक्षा अधिक कामे करतो. शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकणे, पित्त तयार करून पचनक्रिया सुधारणे, जीवनसत्वे आणि प्रथिने शरीरात साठवून ठेवणे, मेटाबॉलिझम नियंत्रणात ठेवणे इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण बऱ्याचदा दारूच्या अतिसेवनामुळे आणि हानिकारक पदार्थाच्या सेवनामुळे लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे अन्नपदार्थ पचन होण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास अडथळा निर्माण होतो. याच्या थेट परिणाम स्नायूंवर आणि पायांच्या शक्तीवर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? सडलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी काय खावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. यामध्ये बेटा-इन पिगमेंट्स लिव्हरच्या पेशी सक्रिय करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. दारू पिऊन सडलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी बीटच्या रसाचे सेवन करावे. बीट रक्त शुद्ध करते.याशिवाय रक्तात साचून राहिलेली घाण, आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी बीट खावे. बीट खाल्यामुळे रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरात वाढलेली कमजोरी, अशक्तपणा किंवा थकवा दूर करण्यासाठी बीटचे सूप, बीट किंवा बीटच्या भाजीचे सेवन करावे.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो.हळदीमध्ये असलेले गुणकारी लिव्हरला आलेली सूज कमी करतात.याशिवाय लिव्हरमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हळदीचे पाणी किंवा हळदीच्या दुधाच्या सेवन करावे. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन लिव्हरमधील घाण बाहेर काढून टाकते आणि लिव्हर स्वच्छ करते.
यकृत खराब होण्याची कारणे:
जास्त मद्यपानामुळे यकृताला दाह होऊन फायब्रोसिस आणि सिरोसिस होऊ शकतो. हेपेटायटीस A, B आणि C सारख्या विषाणूंमुळे यकृताला संसर्ग होऊन जळजळ होऊ शकते.
यकृत खराब होण्याची लक्षणे:
यकृत रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नसल्याने मळमळ आणि थकवा जाणवतो. डोळे किंवा त्वचा पिवळी पडणे. मानसिक स्थिती किंवा वर्तनात असामान्य बदल होणे.
यकृताच्या आरोग्यासाठी काय करावे:
हिरव्या पालेभाज्या, सॅल्मन आणि मॅकरेलसारखे चरबीयुक्त मासे, आणि हळद यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.