सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' बारीक फळाचे सेवन
कोरोनानंतरच्या काळात जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढलेले आजारपण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे काहीवेळा आजारपण वाढू लागतात. अशावेळी कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन आहारात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. आयुर्वेदिक फळे आणि वनस्पतीचे सेवन शरीराला पोषण देते.(फोटो सौजन्य – istock)
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले फळ म्हणजे आवळा. आवळा खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर निरोगी ठेवतात. शरीरात निर्माण झालेली विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृतासमान मानले जाते. त्यामुळे कायमच आवळ्याचे किंवा आवळा पावडरचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला आवळा खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
आयुर्वेदामध्ये मानवाचे तीन दोष शरीराचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे या दोषाचे संतुलन बिघडल्यानंतर शरीराला वेगवेगळ्या आजारांची लागण होते. वात, कफ, पित्त हे तीन दोष आहेत. या सर्व दोषांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराला पोषण देतात. त्यामुळे आहारात कायमच आवळ्याचे सेवन करावे. शरीरात पित्त दोष वाढल्यामुळे वारंवार अपचन, गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. आवळ्यामध्ये आढळून येणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते, त्वचेची गुणवत्ता सुधारते, त्वचेची लवचिकता वाढते आणि केसांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा, चुकूनही करू नका नियमित सेवन
काहींना कच्चा आवळा खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे आहारात कोणत्याही वेळी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. याशिवाय शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून उपाशी पोटी सेवन केल्यास पचनाच्या सर्वच समस्या दूर होतील. मधुमेह आणि लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आवळ्याचे सेवन करावे.
आयुर्वेदातील तीन दोष कोणते:
वात, पित्त, कफ हे आयुर्वेदातील तीन दोष आहेत. यातील कोणताही एक दोष शरीरात वाढल्यानंतर गंभीर आजारांची शरीराची लागण होते.
दोषांचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो:
तुमच्या प्रकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोषांचे अद्वितीय मिश्रण गर्भधारणेच्या वेळी स्थापित होते आणि ते तुमची अंतर्निहित शारीरिक आणि मानसिक रचना निश्चित करते.