डिटॉक्स ड्रिंक्स
राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाचे आगमन झाल्यामुळे मुंबईकरांना गर्मीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये रोगराई, आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. तसेच जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. शरीरामध्ये अनेक विषारी घटक शरीरामध्ये जमा होतात. त्यामुळे रोजच्या रोज शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स केल्याने यकृत निरोगी राहण्यास मदत होते. शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी आहारात बदल करून योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करावा, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हर्बल टी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हर्बल चहा पिण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर देखील आपल्याला देतात. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी हर्बल चहाचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला देखील फायदे होतात. हर्बल चहामध्ये तुम्ही पेपरमिंट चहा, कॅमोमाईल चहा इत्यादी वेगवेगळ्या चहा पिऊ शकता. या चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने शरीर डिटॉक्स राहण्यास मदत होते. नियमित हर्बल टी चे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारून झोप व्यवस्थित येते.
बीट आल्याचा रस
बीटरूटचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. बीटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. तसेच आल्याचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. यकृतामध्ये असलेले विषारी पदार्थ साफ करण्याचे काम बीट आणि आल्याचा रस करते. शरीरामध्ये होणारी जळजळ कमी करण्यासाठी आल्याचा रस प्रभावी आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात.
आलं लिंबाचा चहा
आलं लिंबाचा चहा सर्वच ऋतूंमध्ये प्याला जातो. या चहा मध्ये असलेले गुणधर्म शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. थंडीच्या वातावरणात लिंबू आल्याचा चहा प्याल्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीरात होणारी जळजळ कमी होते. व्हिटॅमिन सी असलेला लिंबाचा प्याल्याने शरीर डिटॉक्स होते.