Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो,मुलांची काळजी घ्या! राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण;‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

मुंबईमध्ये चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. चिकनगुनिया झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया चिकनगुनियाच्या रुग्णांची आकडेवारी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2024 | 02:58 PM
चिकनगुनिया हा आजार कसा पसरतो

चिकनगुनिया हा आजार कसा पसरतो

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात डेंग्यु, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मुंबई पुण्यासह इतर ठिकाणी रुग्ण संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मागील 3 वर्षांमध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण यंदाच्या वर्षी आढळून आले आहेत. बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये चिकुनगुनियाचे केवळ 22 रुग्ण आढळून आले होते. तर 2023 मध्ये 250 मुंबईकरांना या आजाराची लागण झाली होती. दरम्यान,यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 578 जणांमध्ये चिकनगुनियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आकडेवारीत दर्शवल्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत, या वर्षाच्या शेवटच्या दहा महिन्यांमध्ये सुमारे 230% अधिक रुग्ण आढळून आली आहेत.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी जास्त पाऊस पडला. शिवाय मुंबईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ताडपत्री, बाहेर फेकलेल्या बाटल्या, भंगार, कचरा इत्यादी गोष्टी बाहेर साचून राहिल्या. तसेच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये डासांना पैदास करण्यासाठी चांगली जागा मिळते. शिवाय घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात सुद्धा डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मुंबईसह इतर सर्वच ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया इत्यादींचे रुग्ण आढळून आले आहेत.

चिकनगुनिया हा आजार कसा पसरतो:

चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार आहे. तसेच हा आजार एडिस डासामुळे पसरतो. हे डास दिवसाच्या वेळी सक्रिय असतात. हे डास सगळ्यात आधी चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीचे रक्त शोषतात आणि इतरांना चावतात. चिकनगुनिया झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या आजाराची लागण झाल्यानंतर ताप, तीव्र सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, त्वचेवर पुरळ उठणे आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईमध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत नागपूरमध्ये सर्वाधिक 1199, पुण्यात 705 आणि मुंबई 578 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे 484 रुग्णांची नोंद झाली आहे आणि पाचव्या स्थानावर असलेल्या अकोलामध्ये 373 रुग्णांची नोंद झाली आहे.बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, यंदाच्या वर्षी केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिकनगुनिया हा आजार दर काही वर्षांनंतर सगळीकडे पसरतो.

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

या पद्धतीने करा स्वतःचे रक्षण:

  • आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी साचून देऊ नका. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते.
  • आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • घराच्या बाहेर असलेले पाण्याचे ड्रम किंवा टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा.

Web Title: Increase in chikungunya cases across the state chikungunya symtoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 02:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.