शरीर निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर व्यायाम किंवा योगासने करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते. अनेकदा जिममधून व्यायाम करून आल्यानंतर जेवणामध्ये किंवा नाश्त्यात नेमकं काय खावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. त्यामुळे तुम्ही आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला जिममधून आल्यानंतर नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश
व्यायाम करून आल्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्ही उकडलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकता. यामुळे लवकर भूक लागणार नाही आणि जेवलेले अन्नपदार्थ सहज पचतील. कडधान्य खायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
जीमध्ये जाऊन व्यायाम करून आल्यानंतर कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने युक्त हरभऱ्याचे सेवन करावे. हरभरे तुम्ही उकडवून किंवा भाजून खाऊ शकता.
आहारामध्ये प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् युक्त बियांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही अंबाडीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ आणि चिया सीड्स इत्यादी बियांचे सेवन करू शकता.
ओट्स बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स आढळून येतात.
लहान मुलांसह मोठ्यांना काजू, बदाम, पिस्ता इत्यादी अनेक फळे खायला खूप आवडतात. त्यामुळे आहारात तुम्ही रोज या पदार्थांचे सेवन करू शकता. ड्रायफ्रूट्समध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.