Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी तुमच्या घरात असणे अत्यंत गरजेचे

आजकाल आपण अशा कित्येक घटना बघतो ज्यात इमारतीत अचानक शॉट सर्किट झाल्यामुळे पूर्ण माळा भस्म होऊन जातो. या अशा घटना विशषतः शहरी भागात होताना दिसतात. आगीमुळे जीवितहानी होण्याची सुद्धा संभावना असते, त्यामुळे तुम्ही नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 18, 2024 | 08:42 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

एक छोटीशी आग थोड्या वेळात किती रौद्र रूप धारण करू शकते, हे आपण सर्वेच जाणतो. हल्ली कधी, कुठे आणि केव्हा आग लागेल हे सांगता येत नाही. गॅस सिलेंडर असो वा गुंतागुंतीची वायरिंग, आपल्या सर्वांच्याच घरी असे कित्येक अग्नी प्रज्वलित करणाऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या घरात आगीचा भडका उडू शकतो.

घराला आग लागणे ही एक गंभीर परिस्थिती असू शकते, ज्यामुळे केवळ मालमत्तेचे नुकसान होत नाही तर जीवाला देखील धोका होऊ शकतो. त्यामुळेच आपल्या सुरक्षिततेसाठी पुढील गोष्टी प्रत्येक घरात असणे अत्यंत महत्वाचे आहे.

फायर अलार्म किंवा स्मोक डिटेक्टर

फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर हे अग्निसुरक्षेसाठी सर्वात मूलभूत आणि आवश्यक गॅझेट आहेत. तुम्ही हे गॅझेट मोठमोठया इमारतीत किंवा मॉलमध्ये पहिले असेल. हे उपकरण धूर किंवा आगीची लक्षणे लवकर ओळखतात आणि लगेच अलार्म वाजवून घरातील सदस्यांना सावध करतात. तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीत, विशेषतः बेड रम आणि स्वयंपाकघरात स्मोक डिटेक्टर असणे गरजेचे आहे.

फायर एक्सटिंग्विशर (Fire Extinguisher)

हे आणखी एक आवश्यक उपकरण आहे जे प्रत्येक घरात असले पाहिजे. यामुळे आग लागल्यास लगेच तुम्ही ती विझवू शकता. अग्निशामक उपकरण स्वयंपाकघर, गॅरेज आणि इतर संभाव्य धोकादायक ठिकाणी ठेवावीत. हे उपकरण आग लवकर विझवते आणि इलेक्ट्रिकल फायरविरूद्ध लगेच कार्य करते. त्यातही इलेक्ट्रिकल फायर पाण्याने विझवता येत नसल्याने फायर एक्सटिंग्विशरचे महत्त्व लक्षणीय वाढते.

फायर ब्लैंकेट (Fire Blanket)

फायर ब्लँकेट हा एक विशेष प्रकारचा ब्लँकेट आहे जो आगीचा प्रसार रोखण्यास यशस्वीरित्या मदत करतो. याचा वापर आग विझवण्यासाठी किंवा आग रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. हे विशेषतः स्वयंपाकघरात ठेवणे खूप फायदेशीर आहे, जेथे लहान आगीच्या घटना सतत घडत असतात. कपड्यांना आग लागल्यास, ब्लँकेट अंगावर झाकून आग विझवता येते.

प्रथमोपचार किट (First Aid Kit)

आगीच्या घटनांमध्ये शरीराला दुखापत किंवा भाजण्याची घटना घडू शकते. म्हणून, घरी एक व्यवस्थित प्रथमोपचार किट ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यात पट्टी, अँटीसेप्टिक क्रीम, बर्न क्रीम, गॉझ पॅड आणि इतर आवश्यक गोष्टी असाव्यात. प्रथमोपचार किट नेहमी तुमच्या आवाक्यात असावे जेणेकरुन अचानक प्रसंगी ते ताबडतोब वापरता येईल.

कार्बन मोनोऑक्साइड डिटेक्टर (Carbon Monoxide Detector)

कार्बन मोनोऑक्साइड हा एक घातक वायू आहे जो आगीच्या वेळी अधिक प्रमाणात तयार होऊ शकतो. हा वायू गंधहीन असतो त्यामुळे तो शोधणे सुद्धा कठीण आहे. त्यामुळेच कार्बन मोनॉक्साईड डिटेक्टर या घटक वायूची गळती ओळखतो आणि लगेच अलार्म वाजवतो, जेणेकरून आपल्याला धोका वेळीच टाळता येऊ शकतो.

Web Title: It is very important to have these devices in your house to control the fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 08:42 PM

Topics:  

  • Fire Safety

संबंधित बातम्या

Fire Accidents in Lanes: रुंद रस्त्यांपेक्षा अरुंद गल्ल्यांमध्येच अग्निकांडाच्या सर्वाधिक घटना का घडतात? जाणून घ्या कारणे!
1

Fire Accidents in Lanes: रुंद रस्त्यांपेक्षा अरुंद गल्ल्यांमध्येच अग्निकांडाच्या सर्वाधिक घटना का घडतात? जाणून घ्या कारणे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.