Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा

Low Carb Noodles Recipe : ही रेसिपी चव आणि हेल्थ यांचा उत्तम समतोल साधते. जर तुम्हाला फिटनेससोबतच चवदार खाणंही आवडत असेल, तर ही लो-कार्ब नूडल्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 10:20 AM
Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश 'लो-कार्ब नूडल्स' घरी बनवून खा

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश 'लो-कार्ब नूडल्स' घरी बनवून खा

Follow Us
Follow Us:
  • नूडल्स हे नेहमी अनहेल्दी मानले जातात.
  • तुम्हालाही नूडल्स खायला आवडत असतील.
  • तर तुम्ही घरी अभिनेत्री जान्हवी कपूरच्या आवडीचे लो कार्ब नूडल्स बनवून खाऊ शकता.
जान्हवी कपूरसारखी फिटनेस-फ्रेंडली आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करायची असेल, तर लो-कार्ब डाएट हा एक उत्तम पर्याय मानला जातो. जान्हवी कपूर तिच्या फिटनेस रूटीनमध्ये हलका, पौष्टिक आणि कमी कार्बोहायड्रेट असलेला आहार महत्त्वाचा असतो. अशा आहारात लो-कार्ब नूडल्स हा एक स्वादिष्ट आणि हेल्दी पर्याय आहे. पारंपरिक मैद्याच्या नूडल्सऐवजी झुकीनी (Zucchini), गाजर किंवा शिरटाकी नूडल्स वापरून बनवलेली ही डिश वजन नियंत्रणासाठी आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी फायदेशीर ठरते.

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी लो-कार्ब पदार्थांकडे वळत आहेत. पण “हेल्दी” म्हणजे “चव नसलेलं” असं नाही! ही लो-कार्ब नूडल्स रेसिपी चवदार, हलकी आणि पटकन तयार होणारी आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी ही रेसिपी तुमच्या दैनंदिन आहारात एक छान बदल घडवू शकते.

साहित्य:

  • 2 मध्यम आकाराचे झुकीनी (Zucchini) / दोडका
  • 1 गाजर (लांब कापलेले)
  • 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल
  • 3-4 लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • 1 टीस्पून सोया सॉस (लो सोडियम)
  • 1/2 टीस्पून मिरची फ्लेक्स
  • मीठ (चवीनुसार)
  • मिरी पावडर (चवीनुसार)
  • थोडं लिंबाचा रस
  • सजावटीसाठी कोथिंबीर
साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम झुकीनीला स्पायरल कटरने किंवा किसणीने नूडल्ससारखे लांब स्ट्रिप्समध्ये कापा.
  • गाजर सुद्धा लांब स्ट्रिप्समध्ये कापून ठेवा.
  • कढईत ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात लसूण घालून हलका परतून घ्या
  • आता गाजर आणि झुकीनी नूडल्स टाकून 2-3 मिनिटं हलक्या आचेवर परता. (जास्त शिजवू नका, नाहीतर ते मऊ पडतील)
  • त्यात सोया सॉस, मीठ, मिरी पावडर आणि मिरची फ्लेक्स घालून छान मिक्स करा.
  • शेवटी लिंबाचा रस घालून एकदा हलवून घ्या.
  • गरमागरम नूडल्स प्लेटमध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सजवा.
  • अधिक प्रोटीनसाठी यात पनीर किंवा टोफू घालू शकता
  • अजून हेल्दी बनवण्यासाठी सॉस कमी वापरा
  • शिरटाकी नूडल्स वापरल्यास कार्ब्स अजून कमी होतात.

Web Title: Janhvi kapoor favourite low carb noodles recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Janhvi Kapoor
  • marathi recipe
  • noodles recipe

संबंधित बातम्या

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
1

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
2

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
3

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
4

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.