पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात आणि त्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्या जातात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. करटोल्याच्या भाजी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते, भाजी खाल्याने आरोग्य निरोगी राहते. करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे.
यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मोठ्या प्रमाणात असतात. सुमारे १०० ग्रॅम करटोल्यांमध्ये १७ कॅलरीज आढळतात. करटोलीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
टिप: करटोलीच्या वरचे आवरण काढू नका. कारण त्यामध्येच अधिक पोषकघटक आहेत.