Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळा सुरू झाल्यावर मोठा प्रश्न असतो तो…मुलांच्या डब्यांचा !!! म्हणूनच सुपरमॉमसाठी खास टीफीन चार्ट

शाळा सुरू झाल्यावर मुलांना डब्यात काय द्यायचं हा मोठा प्रश्न तमाम आयांना सतावत असतो. अशावेळी एखादा टीफीन चार्ट करून ठेवला तर, रोजच्या टीफीनचा प्रश्न सुटेल नाही का? आणि म्हणूनच खास आमच्या सुपरमॉम साठी आम्ही आणला आहे हा टीफीन चार्ट....हा टीफीन चार्ट फॉलो करा आणि मुलांना हेल्दी आणि टेस्टी फूड द्या

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 13, 2023 | 01:44 PM
शाळा सुरू झाल्यावर मोठा प्रश्न असतो तो…मुलांच्या डब्यांचा !!! म्हणूनच सुपरमॉमसाठी खास टीफीन चार्ट
Follow Us
Close
Follow Us:

जून महिना सुरू होताच प्रत्येक आईला मुलांच्या डब्याचं टेन्शन येतं. रोज-रोज आपल्या मुलांच्या टीफीन बॉक्समध्ये काय द्यायचं जे हेल्दी असेल आणि टेस्टी असेल. आवडीचा खाऊ डब्यात नसेल तर, मुलं डब्बा खात नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांची आवडही सुपरमॉमला लक्षात घ्यावी लागते. मुलांचा शाळेचा डबा तयार करताना त्यांच्या आरोग्याचा आणि आरोग्यासाठी लागणा-या पोषक घटकांचाही विचार करा. मुलांच्या आरोग्यासाठी काय उपयुक्त आहे, काय नाही याचा विचार करून डबा बनवला, तर मुलांचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे मुलांचा डबा बनवताना काही गोष्टींची काळजी घ्या.

मुलांचा डबा बनवताना घ्या, ही काळजी!

 मुलांना डब्यामध्ये कधीच फळं किंवा भाज्या कापून देऊ नका. कारण, त्यातून पोषक घटक मिळत नाहीत आणि ते खराब   होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना डब्यात सलाड देणे टाळा.

मुलांना डब्यात सफरचंद, पेरू, केळी, चेरी, जामुन ही फळं देण चांगलं आहे. कारण, ही फळं रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.

मुलांना डब्यात सँडविचसारखी फास्ट फूड देण्यापेक्षा पालेभाज्या द्या.

मुलांच्या डब्यात तव्यावर फ्राय केलेल्या भाज्या द्या. यातून मुलांना आवश्यक ते पोषण मिळते. मुलांना डब्यात ते तुम्ही देऊ    शकता. याला जास्त वेळही लागत नसून, भाज्यांच्या माध्यमातून मुलांना आवश्यक ते पोषण घटक मिळतात.

मुलांना डब्यात कडधान्यांचे पॅनकेक बनवून द्या. ते बनवणेही सोपं आहे शिवाय मुलांना ते आवडतंही आणि यातून शरीराला  फायबरही मिळते.

मुलांना तळलेले स्नॅक्स देण्यापेक्षा भाजलेले पदार्थ खायला द्यावेत.

पालेभाज्या या शरीराला पोषक असतात, म्हणून पालेभाजी मुलांना डब्यामध्ये देत जा. 

 

मुलं ब-याचवेळा भाज्या खाण्यासाठी नकार देतात अशावेळी मुलांना त्या-त्या भाज्या पराठ्यांमधून, थालिपिठातून खायला द्याव्यात. जेणे करून त्या भाज्या त्यांच्या पोटात जातील.

पालक,मेथी,बीट,बटाटा,पनीर यांचे पराठे मुलांना आवडतात. थालिपीठ करताना त्यात कांद्याबरोबरच कोबी,काकडी,गाजर किसून घातल्यास मुलांना ते हमखास आवडणार. मुलांना फास्ट फूड आवडतं पिझ्झा,बर्गर,पास्ता यांसारखे पदार्थ करताना ब्राऊन ब्रेड किंवा ब्राऊन बेसचा वापर करा. किंवा भाकरी – पोळी यावर अगदी पिझ्झा टॉपिंग टाकून टीफीनमध्ये द्या. मुलं आवडीने खातील. टीफीनही फस्त होईल. इडली,ढोकळा,रव्याचे अप्पे हे टीफीनसाठी खूप चांगले पर्याय आहेत. हे सगळं करताना आदल्यादिवशी तुम्हाला तयारी करून ठेवावी लागेल. तसंच एक चार्ट तयार करा आणि तो चार्ट आपल्या फ्रीजवर लावून ठेवा. त्यामुळे अगदी न विसरता तुम्ही हेल्दी टीफीन करू शकालं.

[read_also content=”अनुष्का शर्माची बदामाच्या दुधाची रेसिपी व्हायरल…बदामाचे दूध शरीर,त्वचा,स्नायूंसाठी फारच उपयुक्त https://www.navarashtra.com/lifestyle/anushka-sharama-almond-milk-recipe-viral-415150/”]

 

 

मुलांचा टीफीन चार्ट – 

 दिवस  पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा चौथा आठवडा
सोमवार  पालक पराठे – 

 कोबी मुठीया 

फ्रूट,डाएट चिवडा

 रव्याचे अप्पे –

व्हेज कटलेट

फ्रूट, पौष्टीक लाडू 

पांढरा ढोकळा –

कॉर्न चॅट 

फ्रूट, चुरमु-याचा चिवडा

काबुली पराठा (छोले )

बाजरी मसाला पराठे

फ्रूट, मिनी बाकरवडी

मंगळवार  मसाला इडली-

 मिनी ब्लॅक पेपर पोटॅटो फ्राय 

फ्रूट, राजगिरा लाडू

 तिखट मीठाच्या पु-या

बेसन चिला 

फ्रूट, रवा केक

 मेथी पराठे 

गार्लिक ब्रेड

फ्रूट, ड्रायफ्रूट

 आलू पराठे

पालक मुठीया

फ्रूट, मखाने

बुधवार  फ्रँकी रोल-

 इडली फ्राय

फ्रूट,ड्रायफ्रूटस्

 थालिपीठ- (कोबी,काकडी,गाजर,फ्लॉवर मिक्स)

स्पिनच कॉर्न कटलेट

फ्रूट, बेल्जियम वॅफल्स

 चीज व्हेज सँडवीच

 नटेला किंवा जॅम रोल(ब्रेड,पोळी)

फ्रूट, डाएट चिवडा

 पिवळा ढोकळा

 शेवयांचा पुलाव 

फ्रूट,रवा केक

 

गुरूवार  व्हेज पुलाव-

 व्हेज रवा इडली

फ्रूट,मखाने

 व्हेज फ्राईड राईस 

मशरूम तवा फ्राय

फ्रूट, ड्रायफ्रूट

  स्पिनच (पालक) राईस

 राजमा चॅट

फ्रूट,राजगिरा चिक्की

 

  व्हेज बिर्यानी

 कॉर्न चीज सँडविच

फ्रूट, चुरमु-याचा चिवडा

शुक्रवार  पनीर सँडवीच –

चीज कॉर्न टीक्की

फ्रूट, शेंगदाणा चिक्की 

बर्गर

काबुली चना चॅट

फ्रूट, मखाने

 पिझ्झा 

मूग चॅट 

फ्रूट,पौष्टीक लाडू

पॅन केक

पनीर ब्रेड पकोडा

फ्रूट, चॉकलेट रवा केक

 

 

Web Title: Kids tiffin chart for school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • healthyfood

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.