भाज्या आणि फळे एकत्र फ्रिजमध्ये ठेवाव्यात का?
बाजारातून विकत आणलेली फळे आणि भाज्या काही घरांमध्ये एकत्र फ्रिजमध्ये साठवून ठेवल्या जातात. सतत बाजारात जायला लागू नये म्हणून आठवड्याभराची भाजी आणि फळे एकदाच आणली जातात. फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पालेभाज्या, फळे, इतर भाज्या आणि अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जातात. फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटली, फळे , भाज्या ठेवण्यासाठी आणि इतर पदार्थ ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये व्यवस्थित अन्नपदार्थ ठेवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला फ्रिजमध्ये एकत्र फळे, भाज्या ठेवल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत.
घरी आणलेल्या भाज्या आणि फळे फ्रिजमध्ये ठेवताना नेहमी वेगवेगळे ठेवावेत. फ्रिजमध्ये असलेला मधला कप्पा फळांसाठी आणि फ्रिजच्या सगळ्यात खाली असलेला कप्पा भाज्यांसाठी असतो. त्यामुळे फ्रिजमधील याच कप्प्यांमध्ये फळे आणि भाज्या ठेवाव्यात. फळे भाज्या एकत्र का ठेवू नये? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. जाणून घेऊया यामागे नेमके काय कारण आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ठिसूळ हाडे मजबूत होण्यासाठी नियमित खा चण्याचा लाडू, वाचा सोपी रेसिपी
भाज्या आणि फळे एकत्र फ्रिजमध्ये ठेवाव्यात का?
फ्रिजमधील थंडाव्यामुळे फळे आणि भाज्या लवकर खराब होत नाहीत. तसेच इतर वस्तूसुद्धा फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. फळे, भाज्यांसोबतच चॉकलेट, औषधे, नेलपेंट, सरबत इत्यादी अनेक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. त्यामुळे कापून ठेवलेली फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नये. कापून ठेवलेल्या फळांमधून वायू बाहेर येतो. हा वायू आरोग्यासाठी घातक असल्यामुळे फ्रिजमध्ये कापून ठेवलेली फळे किंवा भाज्या ठेवू नयेत.
जास्त पिकलेली फळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ती लगेच खराब होतात. यामध्ये असलेले जास्त इथिलीन फळांसोबतच भाज्यासुद्धा खराब करून टाकतात. त्यामुळे फळे आणि भाज्या एकत्र फ्रिजमध्ये कधीच ठेवू नये. घरी आणलेल्या सर्वच भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नये. बटाटा किंवा कांदा यांसारख्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर लगेच खराब होऊन इतर पदार्थसुद्धा खराब होण्यास सुरुवात होते. इथिलीन जास्त असलेली फळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर फळांचा रंग पूर्णपणे बदलून जातो. तसेच त्यांची चवही बिघडते.