Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमची सुद्धा सकाळची सुरुवात ब्लॅक कॉफीने होते? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान

हल्ली अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करतात, पण कधी विचार केला आहे का की याचे आरोग्यावर कोणते फायदे आणि दुष्परिणाम होऊ शकतात? चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 08, 2024 | 09:32 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

हल्ली ब्लॅक कॉफी पिण्याचे फॅड खूप वाढले आहे. अनेक जण चहाच्या टपरीवर जाऊन ब्लॅक कॉफीची मागणी करत असतात. तसेच अनेक कॉर्पोरेट कंपनीत काम करणारे कर्मचारी सुद्धा ब्लॅक कॉफी पिऊ लागले आहेत.

अनेक जण आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. सकाळची सुरुवात एक कप कॉफीने करणे ही बऱ्याच जनाची सवय झाली आहे, परंतु ज्याप्रमाणे ब्लॅक कॉफी तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे त्याचप्रमाणे ती हानिकारक देखील आहे. चला आज आपण ब्लॅक कॉफीचे फायदे आणि नुकसानाबद्दल जाणून घेऊया.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

डायबिटीसपासून होतो बचाव

ब्लॅक कॉफी प्यायल्याने टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो अशी माहिती अनेक अभ्यासातून मिळाली आहे. ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिनच्या निर्मितीला प्रोत्साहन देते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

हे देखील वाचा: एंडोमेट्रिओसिसची समस्या असलेल्या 29 वर्षीय महिलेची यशस्वी गर्भधारणा

तणाव कमी होतो

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत तणाव आणि थकवा येणे सामान्य आहे, परंतु ब्लॅक कॉफीमध्ये असलेले कॅफीन तुमच्या मेंदूला त्वरित सक्रिय करते, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि तणाव कमी होतो.

वजन कमी होते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ब्लॅक कॉफी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ब्लॅक कॉफीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात जे तुमचे मेटाबॉलिज्म वाढवून वजन कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. यासोबतच, ब्लॅक कॉफी पचन आणि मूड देखील सुधारते.

ब्लॅक कॉफी पिण्याचे नुकसान

झोपेचा अभाव आणि अस्वस्थता

ब्लॅक कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते, ज्यामुळे तुमचा मेंदू सक्रिय होतो. यामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडू शकते. यामुळेच रात्रीच्या वेळी कॉफी किंवा कॅफेनयुक्त पेय पिणे टाळा.

पचन समस्या

ब्लॅक कॉफीमध्ये असलेले ॲसिड आणि कॅफीन ॲसिडिटी, गॅस आणि इतर पचन समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. जर तुम्ही आधीच पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर ब्लॅक कॉफीचे पिणे तुमच्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते.

हृदयरोग्यांनी टाळावे

कॅफिनमुळे मोठ्या प्रमाणात हृदयाची गती वाढू शकते. तसेच हे ब्लड प्रेशरचे कारण बनू शकते. त्यामुळे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी ब्लॅक कॉफी धोकादायक ठरू शकते.

गर्भवती महिलांसाठी हानिकारक

गर्भवती महिलांनी ब्लॅक कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन करावी किंवा अजिबात करू नये कारण कॅफिन मोठ्या प्रमाणात बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते.

कॅफिन व्यसन

सतत ब्लॅक कॉफी प्यायल्याने तुम्हाला कॅफिनचे व्यसन लागू शकते, ज्यापासून मुक्त होणे खूप कठीण आहे आणि त्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि चिडचिड यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Web Title: Know the pros and cons of black coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 08:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.