एंडोमेट्रिओसिस
मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे येथील स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील टीमने एंडोमेट्रिओसिसची समस्या असलेल्या रिया (नाव बदलले आहे) या २९ वर्षीय विवाहित महिलेवर यशस्वी उपचार केले. अंडाशयाच्या दोन्ही बाजूंना चिकटलेल्या गाठी – मदरहुड हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आलेत.
लुल्लानगर येथे राहणाऱ्या श्रीमती रिया या गेल्या पाच वर्षांपासून गंभीर एंडोमेट्रिओसिसशी झुंज देत होत्या, तिला मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत तीव्र वेदना होत होत्या. या स्थितीमुळे तिच्या दैनंदिन जीवनावर आणि प्रजनन क्षमतेवर लक्षणीय परिणाम झाला. मदरहुड हॉस्पिटल्समध्ये उपचाराकरिता आलेल्या या रुग्णाला अंडाशयाला दोन्ही बाजूंनी गाठी चिकटून असल्याचे आढळून आले. ही एंडोमेट्रिओसिसशी संबंधित एक गुंतागुंत आहे.
एंडोमेट्रिओसिस ही एक आव्हानात्मक स्थिती आहे जी गर्भाशयाच्या बाहेरील अस्तरांप्रमाणेच ऊतकांच्या वाढीद्वारे दर्शविली जाते. हे असामान्य ऊतक विविध अवयवांवर रोपण करू शकतात, ज्यामुळे वेदनादायक मासिक पाळी, ओटीपोटात वेदना आणि वंध्यत्व यांसारखी लक्षणे दिसून येतात. सुदैवाने एंडोमेट्रिओसिस हा उपचाराने बरा होऊ शकतो आणि बऱ्याच महिला योग्य काळजी घेऊन यशस्वी गर्भधारणा करू शकतात. भारतात 6 ते 10% स्त्रिया एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत. या महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण सर्वसाधारण महिलांच्या तुलनेने 5-6 पट जास्त आहे. दुसरीकडे वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या रुग्णांमध्ये एंडोमेट्रिओसिसची शक्यता 40-50% पर्यंत असते.
हेदेखील वाचा – गर्भाशय काढून टाकल्यानंतर भविष्यात महिलांमध्ये उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या
डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी या रुग्णाची तपासणी केली असता रियाला अंडाशयाच्या दोन्ही बाजूंना सिस्ट्स असल्याचे दिसून आले. जे जवळपास 8 सेमी लांबीचे होते. यामुळे मासिक पाळीदरम्यान वेदना आणि वंध्यत्व येऊ शकते. रियाच्या गर्भधारणेतील आव्हाने समजून घेण्यासाठी ही तपासणी आवश्यक होती. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी लॅपरोस्कोपिक सिस्टेक्टॉमी केली, जी रियाच्या अंडाशयांचे नुकसान न करता सिस्ट काढून टाकण्यासाठी केली जाते. याव्यतिरिक्त शरीर रचना सुधारण्यासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी विशेष उपचार केले गेले. रियाचा वंध्यत्वाचा इतिहास पाहता, डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी प्रजनन उपचार पर्याय म्हणून इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) चा सल्ला दिली. IUI मध्ये ओव्हुलेशन दरम्यान निरोगी शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात, ज्यामुळे यशस्वी गर्भाधानाची शक्यता वाढते.
डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी सांगितले की, अलिकडच्या वर्षांत एंडोमेट्रिओसिसचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दहा वर्षात , एंडोमेट्रिओसिसच्या प्रकरणांमध्ये विशेषत: 24-29 वर्षे वयोगटात या समस्येची तीव्र वाढ झाल्याचे दिसून आले. दर आठवड्याला 2-3 प्रकरणे आढळून येतात. गर्भधारणेला होणारा विलंब हा या वाढीस कारणीभूत ठरणारा एक घटक आहे. एंडोमेट्रिओसिस प्रजनन क्षमतेवर लक्षणीय परिणाम करतो, परंतु अनेक स्त्रिया योग्य उपचाराने यशस्वी गर्भधारणा करू शकतात.दरवर्षी स्त्रीरोग तपासणी करणे गरजेचे आहे. रियाच्या बाबतीत, लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि आययुआय प्रक्रियेने या साऱ्या आव्हानांवर मात केली.
डॉ. श्रीवास्तव पुढे सांगतात की, एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रिया नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकतात, अशावेळी आयव्हीएफ उपचार करावे लागतीलच असे नाही. प्रजनन क्षमता वाढवणारी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया पेल्विक शरीर रचना पुनर्संचयित करू शकते आणि अडीशयाचे कार्य सुधारू शकते. एंडोमेट्रिओसिस असलेले अंदाजे 25-30% रुग्ण केवळ औषधोपचारानेच गर्भधारणा करतात.
हेदेखील वाचा – गरोदरपणात चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी; होऊ शकतो गर्भपात
ओव्हेरियन रिझर्व्हचे मूल्यांकन करण्यासाठी, अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) चाचणी आवश्यक आहे. ही चाचणी अंड्यांचा साठा मोजते व प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरते. ही चाचणी विशेषतः 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी सुचविली जाते, ज्यांना वंध्यत्वाचा इतिहास आहे आणि ज्यांना प्रजनन उपचारांचा विचार आहे आणि ज्या तरुणींना त्यांची प्रजनन क्षमता जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते.
रिया यांनी मदरहूड हॉस्पिटलच्या डॅाक्टरांचे आभार मानले. ती म्हणाली, एंडोमेट्रिओसिसमुळे होणाऱ्या वेदन मला कमजोर करत होत्या आणि मी आई होण्याची आशा गमावत होते. डॉ. पद्मा श्रीवास्तव आणि त्यांच्या टीमने माझ्यावर योग्य उपचार करत माझे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली.
हे प्रकरण स्पष्ट करते की एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिला योग्य वैद्यकीय उपचाराने त्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करु शकतात. मदरहूड हॉस्पिटल्सची टीम ही वंध्यत्वाची मूळ कारणे दूर करण्यासाठी आणि एंडोमेट्रिओसिसशी संबंधित आव्हानांना मात करत अचुक उपचार पुरवित गर्भधारणेस मदत करते.






