फोटो सौजन्य: Freepik
सध्या बदलत्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खानपानामुळे अनके आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. यातीलच एक आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर. आज थोडी चाळीशी किंवा पन्नाशी उलटली की अनेकांना ब्लड प्रेशरच्या समस्यांशी सामना करावा लागतो. एकदा का हा आजार जडला की मग त्या सततच्या गोळ्यांमुळे अनेक वीट येतो. कित्येकजण तर या आजारापेक्षा गोळ्यांनाच जास्त कंटाळतात. मग डॉक्टरांना एक प्रश्न विचारला जातो. ब्लड प्रेशरची औषधे अचानक बंद केल्यास काय होते?
जर तुम्ही बीपीचे रुग्ण असाल आणि अचानक ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेणे तालात असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण अचानक औषध बंद केल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमच्या आरोग्य तज्ञाकडून बीपी तपासल्यानंतरच औषध बंद करा. स्वतःहून औषधे घेणे बंद करणे आरोग्यासाठी चांगले नाही.
बीपीची औषधे सामान्यतः आयुष्यभर घेतली जातात. परंतु काही लोकं असतात ज्यांना ही औषधं घेणे आवडत नसते. तपासणीनंतर डॉक्टर काही काळ ही औषधं बंद करतात किंवा ती बदलतात. अतिरिक्त वजन उचलणे, धूम्रपान करणे, जास्त मद्यपान करणे, जास्त मीठ खाणे, जास्त ताण आणि टेन्शन घेणे, अशा लोकांना हाय बीपीची समस्या असते.
हाय बीपीचे औषधं अचानक बंद करणे ठीक आहे की नाही हे तुमच्या बीपीचे कारण काय आहे यावर पूर्णपणे अवलंबून असते. हाय ब्लड प्रेशर दोन कारणांमुळे होतो. एक बदलण्यायोग्य आहे आणि दुसरा अपरिवर्तनीय आहे.
जर एखाद्या व्यक्तीला किडनीचा जुनाट आजार, मधुमेह, वृद्धापकाळ, किंवा हाय ब्लड प्रेशरचा कौटुंबिक इतिहास असेल तर अशांची हाय ब्लड प्रेशरची औषधे बंद केली जातात. तसेच स्लीप एपनिया, कॅन्सर, थायरॉईडचे रुग्ण असतील तर त्यांचे सुद्धा औषधं बंद केली जातात.