त्वचेच्या आरोग्यासाठी कडुलिंबाची पाने प्रभावी
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीनमुळे आरोग्य बिघडते. त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून आल्यानंतर पिंपल्स, डार्क सर्कल, चेहऱ्यावर काळे डाग, चेहरा काळा पडणे , चेहरा अतिरिक्त तेल साठणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. चेहेऱ्यावर पिंपल्स येण्यामागे काही कारण सुद्धा आहेत. पोट स्वच्छ न झाल्यामुळे चाऱ्यावर पिंपल्स येतात. शरीरातील विषारी पदार्थ पोटात साचून राहिल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येऊ लागतात. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारून योग्य ती जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करावा.(फोटो सौजन्य-istock)
अनेक महिला त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्ट वापरतात. पण या सगळ्यामुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेला सूट न होणाऱ्या केमिकल प्रॉडक्टचा वापरत न केल्यामुळे चेहरा खराब होऊन जातो. त्यामुळे कमीत कमी केमिकल प्रॉडक्टचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला अशा एका पानाबद्दल सागंर आहोत. जे पान त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: पिंपल्स घालवण्यासाठी चेहऱ्यावर लसूण चोळत असाल तर थांबा! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
त्वचेच्या आरोग्यासाठी कडुलिंबाची पाने प्रभावी
त्वचेच्या सर्व समस्यांवर कडुलिंबाचे पान प्रभावी आहे. मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जात आहे. या पानांचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील डाग, पुरळ , मुरूम निघून जाण्यास मदत होईल.सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी किंवा इतर वेळी कडुलिंबाचे एक किंवा डोंट पाने चावून त्यावर कोमट पाणी प्यायल्यास पोट स्वच्छ होईल. पोट स्वच्छ झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणार नाहीत.
हे देखील वाचा: दातावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी १० रुपयांचे ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, दातांवर येईल चमक
कडुलिंबाच्या पानांत असलेल्या गुणधर्ममुळे पिंपल्स आणि मुरूम निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावर फोड आणि मुरुमांच्या काळ्या डागांनी त्रस्त असला तर कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने त्वचा आणि चेहरा स्वच्छ होऊन तरुण दिसेल,. त्यामुळे कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन करावे. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांचा विशेष महत्व आहे. काळा पडलेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी कडुलिंबाचे पण प्रभावी ठरते.