Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरूषहो! Trekking ला जाताय तर आता व्हा सावध; फर्टिलिटीवर होतोय दुष्परिणाम येतंय वंध्यत्व, रिसर्चमध्ये खुलासा

हे संशोधन अशा पुरुषांसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे जे नियमितपणे ट्रेकिंग करतात किंवा जास्त काळ उंच भागांवर राहतात. उंचीसह प्रजनन क्षमता यांच्यातील हा संबंध तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 26, 2025 | 03:21 AM
ट्रेकिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

ट्रेकिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला पर्वतांमध्ये ट्रेकिंगची आवड असेल तर ही बातमी तुमच्या आरोग्याबद्दलच्या चिंता वाढवू शकते. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की उंचावरील ट्रेकिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कमी ऑक्सिजन, थंड तापमान आणि शारीरिक थकवा यासारख्या पर्वतांच्या कठोर परिस्थितीमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

नेचर रिव्ह्यूज युरोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की उंचावरील ट्रेकिंग आणि इतर क्रियाकलापांचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. संशोधनात पुढे असे सूचित केले आहे की ‘टेस्टिक्युलर हायपोक्सिया’ (अंडकोषांमध्ये ऑक्सिजनची कमतरता) गेल्या ५० वर्षांत पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत घट होण्याचे एक महत्त्वाचे घटक असू शकते, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock) 

टेस्टिस हायपोक्सिया म्हणजे काय?

टेस्टिक्युलर हायपोक्सिया म्हणजे अंडकोषांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. हे स्लीप एपनिया आणि व्हॅरिकोसेल सारख्या अनेक जुनाट आजारांमुळे असू शकते. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि न्यूकॅसल विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) येथील पुनरुत्पादक जीवशास्त्रज्ञ डॉ. टेसा लॉर्ड म्हणाले की, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होण्याच्या सुमारे ४५ टक्के प्रकरणांमध्ये व्हॅरिकोसेल ज्याला अंडकोषातील नसा वाढतात असे म्हटले जाते ते याठिकाणी आढळते 

पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

ट्रेकिंग आणि Sleep Apnea चा परिणाम 

उंच ठिकाणी ट्रेकिंग केल्याने अंडकोषांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या यावर नकारात्मक परिणाम होतो. तथापि, हा परिणाम तात्पुरता आहे आणि समुद्रसपाटीवर परतल्यानंतर काही महिन्यांनी तो सामान्य होऊ शकतो. स्लीप एपनियामुळे टेस्टिक्युलर हायपोक्सिया देखील होतो. लठ्ठपणाच्या वाढत्या घटनांमुळे ही समस्या सामान्य होत चालली आहे.

प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम 

डॉ. लॉर्ड म्हणाले की टेस्टिक्युलर हायपोक्सियाचे परिणाम केवळ शुक्राणूंपुरते मर्यादित नाहीत. याचा परिणाम गर्भाच्या विकासावर आणि पुढच्या पिढीच्या प्रजनन क्षमतेवर देखील होऊ शकतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की वडिलांच्या टेस्टिक्युलर हायपोक्सियामुळे जन्मलेल्या मुलांना विकासात्मक समस्या येऊ शकतात आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

40 नंतरही मजबूत करतील Fertility ‘हे’ 5 पदार्थ, महिला आणि पुरुषांनी आहारात समाविष्ट कराच

पुरुषांनी काय करावे?

पुरुषांनी त्यांच्या प्रजनन क्षमतेची काळजी घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. व्हॅरिकोसेल आणि स्लीप एपनिया सारख्या आजारांवर उपचार करण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि उंच ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याशिवाय डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला पाहिजे 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Latest study revealed trekking could be effective for men fertility issue know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 03:21 AM

Topics:  

  • Trekking

संबंधित बातम्या

हादरवणारी दृश्ये, भारतातल्या ‘या’ ठिकाणी आहे सांगाड्यांचा तलाव; पाणी पाहण्यासाठी करावं लागत रात्रंदिवस ट्रेकिंग
1

हादरवणारी दृश्ये, भारतातल्या ‘या’ ठिकाणी आहे सांगाड्यांचा तलाव; पाणी पाहण्यासाठी करावं लागत रात्रंदिवस ट्रेकिंग

भटक्यांनो! ट्रेकिंगच्या तयारीला लागा… मुंबईहून किंचित अंतरावर असणाऱ्या ‘या’ किल्ल्यांना भेट द्या
2

भटक्यांनो! ट्रेकिंगच्या तयारीला लागा… मुंबईहून किंचित अंतरावर असणाऱ्या ‘या’ किल्ल्यांना भेट द्या

Raigad News : काळ आला पण वेळ नाही; मुंबईतील तीन ट्रेकर्सना ढाकभैरी टेकडीवरुन केलं रेस्क्यू
3

Raigad News : काळ आला पण वेळ नाही; मुंबईतील तीन ट्रेकर्सना ढाकभैरी टेकडीवरुन केलं रेस्क्यू

Raigad :  काळ आला पण वेळ नाही ; रखरखत्या उन्हात पेब किल्ल्यावर ट्रेकींग करणं बेतलं जीवावर
4

Raigad : काळ आला पण वेळ नाही ; रखरखत्या उन्हात पेब किल्ल्यावर ट्रेकींग करणं बेतलं जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.