फर्टिलिटी वाढविण्यासाठी कोणते पदार्थ खावेत
जगभरात वंध्यत्व ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘Infertility’ म्हणतात. खराब जीवनशैली, अस्वास्थ्यकर अन्न, वाढत्या वयात विवाह किंवा कोणत्याही आजारासह इतर कारणांमुळे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत जीवनशैली आणि आहारात काही बदल करणे आवश्यक आहे, जेणेकरून ही समस्या टाळता येईल.
साधारण 30 किंवा 40 वर्षांनंतर महिलांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढतो. त्याच वेळी, पुरुष 50 वर्षांच्या जवळ आल्यावर त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. कमी टेस्टोस्टेरॉन, कमी शुक्राणूंची संख्या, ओव्हुलेशन डिसऑर्डर, म्हातारपण, धूम्रपान, चुकीच्या आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली यामुळे वंध्यत्व येऊ शकते (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अहवाल
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मोठ्या संख्येने लोक त्यांच्या आयुष्यात वंध्यत्वाने ग्रस्त असतात. प्रौढ लोकसंख्येपैकी सुमारे 17.5 टक्के, जगभरातील अंदाजे 6 पैकी 1, वंध्यत्वाचा अनुभव घेते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आहारात काही बदल केले आणि काही आरोग्यदायी गोष्टींचे सेवन केले तर प्रजनन क्षमता वाढवता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही 5 सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
डाळी आणि बीन्स
डाळी आणि बीन्समुळे मिळेल फायदा
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळी आणि सोयाबीनचा समावेश करू शकता. त्यामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ओव्हुलेशन सुधारण्यास मदत होते. यासोबतच त्यामध्ये फोलेट देखील असते, जे गर्भधारणा आणि निरोगी भ्रूण विकासास मदत करते. याव्यतिरिक्त, अनेक अभ्यासांनी हेदेखील उघड केले आहे की प्राण्यांच्या प्रथिनांच्या जागी प्रथिनांच्या वनस्पती स्त्रोतांसह ओव्ह्युलेटरी वंध्यत्वाचा धोका कमी होऊ शकतो.
पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
हिरव्यागार भाज्यांचा समावेश
आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा
पालक, केल आणि कोलार्डसारख्या हिरव्या पालेभाज्या प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. ते फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, जे ओव्हुलेशन प्रक्रियेस मदत करतात. एवढेच नाही तर हिरव्या भाज्या खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोकाही कमी होतो. अशा परिस्थितीत स्त्री आणि पुरुष दोघांनीही प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाव्यात असा सल्ला डॉक्टरही देतात आणि याशिवाय अनेक अभ्यासातूनही याबाबत सांगण्यात आले आहे
केळ्याचा करा समावेश
नियमित केळं खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढते
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी केळी हेदेखील सुपरफूड मानले जाते. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 असते, जे हार्मोन्स नियंत्रित करते आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. याशिवाय, यात ब्रोमेलेन नावाचे दुर्मिळ एन्झाइम असते, जे सेक्स हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी ओळखले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही केळीचे सेवन करू शकता.
वडील होण्याचं स्वप्नं मिळेल धुळीला, Male Fertility पासून वाचण्यासाठी वेळीच सोडा 3 सवयी
अवाकाडोचा करा वापर
नाश्त्यात करा अवाकाडोचा समावेश
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी एवोकॅडोचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात जे हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. याशिवाय, त्यात फोलेट देखील असते, जे गर्भधारणेसाठी खूप महत्वाचे आहे. तुम्ही नियमित नाश्त्यामध्येही याचा समावेश करून घेऊ शकता
अक्रोड खाण्याने होईल फायदा
अक्रोड खाण्याने फर्टिलिटीला होतो फायदा
प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांनी युक्त असलेले ड्रायफ्रूट्स देखील प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. विशेषत: अक्रोडाचा आहारात समावेश करावा, कारण ते ओमेगा-३ चा चांगला स्रोत आहे, जो शुक्राणूंना निरोगी ठेवण्यासाठी ओळखला जातो. अभ्यासानुसार, अक्रोडचे दररोज सेवन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.