दारू न पिताही सोडू शकते लिव्हर! पायांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
कायम निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते. त्यामुळे नियमित लिव्हर डिटॉक्स होणे आवश्यक आहे. तसेच लिव्हर शरीरातील ५००पेक्षा अधिक काम करतो. फॅट्स आणि हार्मोनचे संतुलन राखणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे इत्यादी अनेक महत्वपूर्ण कामे लिव्हर करते. पब लिव्हरचे आरोग्य खराब झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते.(फोटो सौजन्य – istock)
नियमित दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे लिव्हरचे कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे लिव्हरला सूज येणे, फॅटी लिव्हर किंवा लिव्हरसबंधित इतरही समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. लिव्हर खराब झाल्यानंतर पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हरच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय लिव्हर शरीरात जमा होणाऱ्या चरबीवर योग्य प्रकारे काम करत नाही. ज्यामुळे गुडघ्याखाली, पायाच्या वरच्या भागावर लालसर आणि तपकिरी डाग दिसून येतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही समस्या अनेकांना सामान्य वाटते. पण दुर्लक्ष केल्यास पायांना सूज येऊ लागते. लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी साठून राहिल्यानंतर हळूहळू पायांचा रंग बदलण्यास सुरुवात होते.
पोटात वाढलेल्या जंतामुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
लिव्हर सिरोसिसमुळे शरीरात एस्ट्रोजेन नावाचे हार्मोन्स वाढत जाते ज्याचा परिणाम लिव्हरच्या कार्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे शिरा फुगून स्पायडर वेन्स तयार होतात. पायांच्या त्वचेखाली जाळ्यासारखी पातळ निळसर किंवा जांभळ्या रंगाची शिरांची जाळी दिसून येते. या शिरा प्रामुख्याने घोट्यांवर किंवा पायांवर जास्त उठून दिसतात. त्यामुळे पायांवर स्पायडर वेन्स दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
यकृताचे नुकसान होण्याची कारणे?
हिपॅटायटीस ए, बी, आणि सी विषाणू यकृताला संक्रमित करून नुकसान पोहोचवू शकतात. जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास यकृतावर विषारी परिणाम होतो आणि यकृताचे नुकसान होऊ शकते.
यकृताचे नुकसान टाळण्यासाठी काय करावे?
अल्कोहोलचे जास्त सेवन यकृतासाठी हानिकारक आहे. जास्त वजन आणि लठ्ठपणा यकृतासाठी हानिकारक आहे, त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. हात स्वच्छ धुवा, विशेषतः जेवण करण्यापूर्वी आणि शौचालय जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे.
यकृताचे नुकसान झाल्यास, ते पूर्णपणे बरे होऊ शकते का?
यकृताचे नुकसान किती गंभीर आहे आणि त्याचे कारण काय आहे यावर बरेच काही अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये, यकृताचे नुकसान दुरुस्त होऊ शकते, तर काहीवेळा ते कायमचे असू शकते. जर यकृताचे नुकसान गंभीर असेल, तर यकृत प्रत्यारोपणाची (liver transplant) देखील आवश्यकता भासू शकते.