
Liver वर वाढलेली अनावश्यक चरबी कायमची जाईल जळून! नियमित प्या 'हे' आयुर्वेदिक ड्रिंक, लिव्हरच्या आजारांपासून मिळेल सुटका
लिव्हर खराब होण्याची कारणे?
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी कोणती पेय प्यावीत?
यकृत खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हर शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे यांच्यासह शरीरातील हजारो कामे लिव्हर शांतपणे करते. पण लिव्हरमध्ये अनावश्यक चरबीचा थर तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे कायमच आरोग्याची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते, ज्यामुळे लिव्हर कॅन्सर, फॅटी लिव्हर आणि लिव्हरवर अनावश्यक चरबीचे थर जमा होतात.(फोटो सौजन्य – istock)
लिव्हरचे आजार केवळ दारू पिणाऱ्या व्यक्तींनाच नाहीतर ‘नॉन-अल्कोहोलिक, कधीही दारूचे सेवन न केलेल्या व्यक्तींना होण्याची सुद्धा शक्यता असते. ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. मात्र कालांतराने लक्षणे वाढतात आणि लिव्हर पूर्णपणे खराब होऊन जाते. काहीवेळा लिव्हरला सूज तर काहीवेळा पोटात पाणी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
प्रत्येक स्वयंपाक घरात आलं कायमच उपलब्ध असते. आल्याच्या वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ आणि चहा बनवताना केला जातो. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाणी करावे. चमचाभर आल्याचा रस प्यायल्यानंतर वरून कोमट पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांसह लिव्हरमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट कम्पाऊंड्स, बायोअॅक्टिव्ह घटक किंवा कम्पाऊंड्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचे सेवन केल्यास शरीरसंबंधित ८० टक्के आजार कायमचे दूर होतील.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी प्यावा. ग्रीन टी मध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ करतात. यामध्ये ‘कॅटेचिन’ नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आढळून येते. लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी नियमित ग्रीन टी प्यावा. स्वादुपिंडातील लायपेज एन्झाइमवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.
गणपती बाप्पाला लोकप्रिय असलेले फुल म्हणून कायमच जास्वंदीच्या फुलांचा उल्लेख केला जातो. हे फुल केवळ बाप्पासाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर मानले जाते. जास्वदींच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर आवश्यक गुणकारी घटक असतात, ज्यामुळे पोटाचा घेर कमी होतो आणि लिव्हर आतून स्वच्छ होते. जास्वदींच्या फुलांचा चहा बनवणे अतिशय सोपे आहे.
Ans: त्वचा आणि डोळे पिवळे होणे (कावीळ), तीव्र थकवा
Ans: पालेभाज्या (पालक, काळे) लिंबूवर्गीय फळे
Ans: गोड पेये आणि प्रक्रिया केलेले अन्न