पोटात वाढलेल्या जंतामुळे त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
पोटामध्ये जंत होणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध लोकांनासुद्धा जंत होतात. जंत झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटात जंत झाल्यानंतर गंभीर संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय जंत झाल्यानंतर शरीराच्या इतरही अवयवांना इजा पोहचते. पोटात जंत झाल्यानंतर पोटदुखी, पेटके, उलट्या, मळमळ, अशक्तपणा, भूक न लागणे, जुलाब इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पोटात वाढलेले जंत कमी करण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. मात्र या गोळ्या काही काळापुरत्या प्रभावी ठरतात. गोळ्यांच्या सेवनामुळे पोटातील जंत कायमचे नष्ट होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेले जंत कायमचे नष्ट करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे पोटातील घाणेरडा मल बाहेर पडून जाईल.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेले जंत कमी करण्यासाठी पीचच्या पानांचा रस अतिशय प्रभावी ठरतो. या पानांमध्ये असलेले गुणधर्म पोटात वाढलेले घाणेरडे जंत कायमचे नष्ट करून टाकतात. पोटात वाढलेले जंत पोटातच मरून जातात आणि त्यानंतर ते विष्ठेद्वारे पोटातून बाहेर पडतात. यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पीचच्या पानांचा २ ते ३ चमचे रस प्यावा. यामुळे पोटात वाढलेले जंत बाहेर पडून जातील. पीचच्या पानांचा रस पिण्याआधी काहीतरी गोड पदार्थ खावा. यामुळे जंत नष्ट होतील.
आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायला जातो. कडुलिंबाची पाने सर्वच आजारांवर अतिशय प्रभावी ठरतात. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने पोटात साचलेली घाण बाहेर काढून टाकतात. याशिवाय आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला विषारी मल बाहेर काढून टाकण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस पिऊन नंतर गरम पाण्याचे सेवन केल्यास पोट स्वच्छ होईल. तसेच तुम्ही उपाशी पोटी कडुलिंबाची ३ किंवा ४ पाने चावून खाऊ शकता.
तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय ही पाने आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहेत. पोटात वाढलेले जंत कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांची चटणी करून खाल्ल्यास पोट स्वच्छ होऊन शरीरातील सर्व घाण बाहेर पडून जाईल. यामुळे पोटात पुन्हा एकदा जंत होणार नाहीत.
पोटातील जंत म्हणजे काय?
पोटातील जंत हे मानवी पचनसंस्थेत राहणारे परजीवी असतात. ते दूषित अन्न, पाणी किंवा माती यासारख्या विविध मार्गांनी संक्रमित होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जंत मानवांना प्रभावित करू शकतात, जसे की राउंडवर्म्स, हुकवर्म्स आणि थ्रेडवर्म्स.
पोटातील जंतांवर उपचार कसे केले जातात?
डॉक्टर अनेकदा जंत नष्ट करण्यासाठी अल्बेंडाझोल किंवा मेबेंडाझोल सारखी औषधे लिहून देतात. पुन्हा संसर्ग रोखण्यासाठी चांगल्या स्वच्छतेच्या पद्धती पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये खाण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर हात चांगले धुणे, फळे आणि भाज्या धुणे आणि स्वच्छ पाणी पिणे यांचा समावेश आहे.
पोटातील जंतांची लक्षणे काय आहेत?
पोटदुखी आणि अस्वस्थता, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, मळमळ आणि उलट्या, भूक न लागणे, थकवा आणि अशक्तपणा, वजन कमी होणे, गुदद्वाराभोवती खाज सुटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.