फोटो सौजन्य - Social Media
लूज मोशन, ज्याला आपण अतिसार म्हणतो, ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. अचानकपणे वारंवार शौचास जाण्याची गरज निर्माण होते आणि यामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. पाण्याची कमतरता, अन्न विषबाधा, दूषित पाणी, खराब अन्न किंवा व्हायरल संसर्ग ही त्याची प्रमुख कारणे असतात. औषधांपेक्षा घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकतात, विशेषतः सौम्य लक्षणांमध्ये.
१. केळी आणि दही
केळी ही फायबरयुक्त असून ती पचनास मदत करते. एक पिकलेली केळी आणि एक चमचा साखर मिसळून त्यात थोडं दही घालून खाल्ल्याने लूज मोशन लवकर थांबतो.
२. जिरे पाणी
जिरे थोडे भाजून पाण्यात उकळून ते कोमट करून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि जुलाब कमी होतो.
३. तांदळाचं मांड
तांदूळ उकळून तयार झालेला मांड म्हणजेच तांदळाचं पाणी लूज मोशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे पोटाला थंडावा देतं आणि पचनसंस्थेला बळकट करतं.
४. ओआरएस (ORS) घ्या
लूज मोशनमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ORS (Oral Rehydration Solution) घ्यायचं कारण म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवणं.
५. दालचिनी आणि मध
दालचिनीची पूड आणि मध एकत्र करून घेतल्यास अन्नविषबाधा आणि सूज कमी होते. यामुळे पचनसंस्था शांत होते.
६. बिल (बेल) फळाचा गर
बेल हे आयुर्वेदात पचनासाठी उत्तम मानले जाते. बेल फळाचा गर किंवा बेल सरबत घेतल्याने अतिसार कमी होतो.
७. कोरडा व हलका आहार घ्या
लूज मोशन असताना तळलेले, मसालेदार पदार्थ टाळून खिचडी, मऊ भात, टोस्ट, सुप वगैरे हलका आहार घ्यावा.
८. हायड्रेशन कायम ठेवा
नारळपाणी, ताक, फळांचा रस, कोमट पाणी यांचा वापर करावा, जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहील.