बाईक चालवल्याने मूल होत नाही हे खरं आहे का? (फोटो सौजन्य - iStock)
सकाळी लवकर ऑफिसला जाण्यासाठी अनेकजण बाईक चालवण्याचा पर्याय निवडतात. तसेच दिवसाची सुरुवात रोज बाईकवरून थकून भागून करत असतो. शहरात राहणारे बहुतेक पुरुष बाईकवरूनच प्रवास करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची ही सवय तुमच्या प्रजनन क्षमतेला हळूहळू हानी पोहोचवू शकते? तर आता प्रश्न असा उद्भवतो की, बाईक चालवणे खरोखरच एखाद्याला वडील होण्यापासून रोखू शकते का?
आज बाईक चालवणे हे केवळ वाहतुकीचे साधन राहिलेले नाही तर ते स्टाईल आणि वेगाचेदेखील प्रतीक बनले आहे. परंतु जास्त वेळ बाईकवर बसल्याने शरीराच्या संवेदनशील भागांवर सतत दबाव येतो, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्हीवर वाईट परिणाम होऊ शकतो. ही फक्त फॅशन किंवा स्टेटसची बाब नाही, तर ही सवय भविष्यात वडील होण्याची शक्यता देखील कमी करू शकते असे आता अभ्यासात सांगण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार, आपण याबाबत अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
कावीळ मुळापासून उपटून काढेल आयुर्वेद, बाबा रामदेवांचा दावा; Liver शुद्ध करण्यासाठी उत्तम इलाज
नक्की कारण काय आहे?
जेव्हा एखादी व्यक्ती सतत बाईक चालवते तेव्हा त्याच्या शरीराच्या एका विशिष्ट भागावर ज्याला पेल्विक एरिया असे म्हणतात, त्याच्यावर शूजमुळे सतत दबाव राहतो. या दाबामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्हीवर परिणाम होतो. यामुळेच मुलं होण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
बाईक चालवणे वाईट नाही, पण जर पद्धत चुकीची असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रजनन क्षमता हा एक नाजूक विषय आहे आणि एकदा तो प्रभावित झाला की तो दुरुस्त करणे सोपे नसते. म्हणूनच, जर तुम्हाला भविष्यात निरोगी वडील व्हायचे असेल, तर आजपासूनच तुमच्या सवयी सुधारा. जर तुम्ही वर उल्लेख केलेल्या काही टिप्स अवलंबल्या तर तुम्हाला वडील होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!
Ovarian Cancer: अंडाशयाचा कर्करोग आणि प्रजननक्षमता, प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हवे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.