मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह केले गंगास्नान (फोटो सौजन्य - Instagram)
सध्या महाकुंभ २०२५ दरम्यान अनेक जण गंगा स्नान करण्यासाठी जातात. याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह दर्शन घेत गंगास्नान केले आणि पवित्र स्नानाचा लाभ घेतला. यावेळी सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांनी. देवेंद्र फडणवीस हे भाजप या पक्षाचे आहेत आणि हिंदुत्वाचा रंग भगवा आहे हे लक्षात ठेवत दोघींनीही चिकनकारी पंजाबी ड्रेस घालून यावेळी सर्वांचे मन जिंकून घेतलं. कसा आहे दोघींचा लुक जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Amruta Fadnavis Instagram)
भगवा चिकनकारी ड्रेस
अमृता फडणवीस यांचा लाघवी लुक
अमृता फडणवीस यांनी यावेळी भगवा ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गंगास्नानाच्या वेळी भक्तीत लीन होऊन प्रार्थना करत असल्याचे अमृता फडणवीस यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अत्यंत साधेपणाने त्यांनी यावेळी पूजा केली आणि गंगेप्रती असणारी आपली भक्ती दर्शवली. त्यांचा हा लुक खूपच लाघवी आणि लोभसवाणा असल्याचे दिसून येत आहे
सिंगल-कॉटन पट्टी किनार साड्या ; पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी एनआयएफटीचा पुढाकार
दिविजा आणि अमृता यांचे Twinning
आई आणि मुलीचे ट्विनिंग
याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची मुलगी दिविजाने देखील आपल्या आईप्रमाणेच भगव्या रंगाचा चिकनकारी ड्रेस परिधान करत ट्विनिंग केल्याचे दिसून आले. हिंदुत्व, भाजप आणि साधुसंतांचे प्रतीक असणाऱ्या भगव्या रंगाचे कपडे परिधान करून दोघींनीही चाहत्यांचे मन जिंकून घेतल्याचे दिसून आले. दिविजाचा साधेपणा आणि तिचा लुकही सध्या व्हायरल होत आहे. नेहमीच आपल्या आई-वडिलांची सावली म्हणून राहणाऱ्या दिविजाचा वेगळेपणा यावेळी जाणवला.
कुटुंबासह गंगास्नान
कुटुंबासह गंगास्नानाचा लाभ
महाकुंभात गंगास्नान करणे हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलीसह गंगास्नान केले. हातात कमंडलू आणि विधीवत पूजा करून कुटुंबाने यावेळी गंगास्नानाचा लाभ घेतल्याचे दिसून आले आहे. तर हा महायोग अगदी आनंदाने आणि मजेत यावेळी साजरे करतानाही हे कुटुंब दिसले.
‘अपने ही रंग में मुझको रंग दे’, अंकिता प्रभू वालावलकरच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल
विधीवत पूजा
पूजेदरम्यान फडणवीस कुटुंबीय
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसह विधीवत पूजाही केली आणि यावेळी त्यांनी पगडी परिधान केली होती तसंच पांढऱ्या रंगाचे उपरणेही गळ्यात घातल्याचे दिसून आले. तर पत्नी अमृता यांनी साधेपणा दर्शवत लाल रंगाचा पांढरी प्रिंट असणारा पंजाबी ड्रेस परिधान करत पूजा केल्याचे दिसून आले. हातात नारळ घेत त्यांनी मनोभावे पूजा केली. तर मुलगी दिविजाने हातात तांब्या धरत पांढऱ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान करत सर्वांचे मन जिंकून घेतले. संपूर्ण पारंपरिक विधी पाळत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने मन जिंकलेच तर त्यांच्या पेहरावाचीही चर्चा झाल्याचे दिसून आले आहे.