Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’! कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ; प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगरमधील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ३८ किमी मुख्य जलवाहिनीची संपूर्ण हायड्रोलिक चाचणी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गळती झाल्यास दुरुस्तीचा खर्च कंत्राटदार उचलणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 03:00 PM
संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’! कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ; प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय
Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये हायड्रोलिक चाचणीला ‘ब्रेक’!
  • कंत्राटदाराची हमीपत्रानंतरही टाळाटाळ
  • प्रशासनाचा चाचणी न घेण्याचा निर्णय
Sambhajinagar New Water Scheme: छत्रपती संभाजीनगरमधील शहराच्या बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेतील जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आलेल्या ३८ किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीची संपूर्ण हायड्रोलिक चाचणी न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत कंत्राटदार कंपनीने जलवाहिनी फुटल्यास किंवा गळती झाल्यास दुरुस्तीचा खर्च स्वतः उचलण्याचे हमीपत्र दिल्यानंतरच ही चाचणी टाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुमारे २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून या प्रकल्पाची अमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत मुख्य जलवाहिनी, जॅकवेल, एमबीआर, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ तसेच २०००, १५०० आणि ११०० मिमी व्यासाच्या जोडवाहिन्यांचे काम पूर्णत्वास आले आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३८ किमी अंतरावर २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या लाईनचे काम अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या आठ ते नऊ किलोमीटरपर्यंत हायड्रोलिक चाचणी घेण्यात आली होती. मात्र, उर्वरित भागाची पूर्ण क्षमतेने चाचणी करण्यात आलेली नाही. कामाच्या दरम्यान जलवाहिनीची अल्ट्रासाऊंड रेडिओलॉजी तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Chhatrapati Sambhajinagar: CTET केंद्रावर मंगळसूत्र उतरवल्याने संताप! हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

महत्त्वाच्या प्रकल्पात संपूर्ण हायड्रोलिक चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्याने काही तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः २५०० मिमी व्यासाच्या मुख्य लाईनसारख्या मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये दाब चाचणी ही गुणवत्ता नियंत्रणाची मूलभूत प्रक्रिया मानली जाते. प्रशासनाने मात्र कंत्राटदाराच्या हमीपत्रामुळे आर्थिक जोखीम कमी होईल, असा दावा केला आहे. प्रत्यक्षात जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतरच या निर्णयाची परिणामकारकता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून अंतिम चाचण्या आणि जोडणी प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य जलवाहिनीची पूर्ण हायड्रोलिक चाचणी घेणे आवश्यक नसल्याचे मत कंपनीकडून मांडण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीमध्ये भविष्यात कोणतीही गळती किंवा फुटीची घटना घडल्यास त्याची दुरुस्ती कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चाने करावी, अशी अट घातली. कंपनीने याबाबत लेखी हमी दिल्यानंतरच चाचणी टाळण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे सांगण्यात येते.

HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड

हायड्रोलिक चाचणी म्हणजे काय?

  • जलवाहिनी टाकल्यानंतर तिची दाब सहन करण्याची क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी घेतली जाते.
  • नियोजित क्षमतेपेक्षा अधिक दाब टाकून गळती किवा संरचनात्मक कमकुवतपणा तपासला जातो.
  • मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनसाठी ही चाचणी तांत्रिकदृष्ट्‌या महत्वाची मानली जाते.
  • चाचणी टाळल्यास भविष्यातील दुरुस्ती खर्च आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water scheme hydraulic test skipped contractor guarantee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devendra Fadanvis

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
4

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.