अंकिता प्रभू वालावकरचा मेहंदी लुक, करूया डिकोड (फोटो सौजन्य - Instagram)
आपल्या वेगवेगळ्या ब्लॉगमधून मालवणी मुलगी अंकिता प्रभू वालावकरने अनेकांचे मन जिंकले आहे. तर त्यानंतर तिने बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होत आपण किती भक्कम खेळाडू आहोत हेदेखील दाखवून दिले. निक्की तंबोळीला सर्वाधिक टक्कर देणारी खेळाडू म्हणून नक्कीच बिग बॉसच्या इतिहासात तिचे नाव कोरले गेले आहे. अंकिताने बाहेर आल्यानंतरच आपल्या बॉयफ्रेंडसह लवकरच आपण लग्नगाठ बांधणार हे जाहीर केले होते आणि आता तिच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे.
अंकिता प्रभू वालावकरने होणारा नवरा कुणाल भगतसह मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. साधेपणा, पारंपरिकता आणि आधुनिकता याचा उत्तम संगम तिने आपल्या या खास दिवसासाठी साधला आहे. कसा आहे अंकिता प्रभू वालावकरचा लुक आपण या लेखातून डिकोड करूया (फोटो सौजन्य – अंकिता प्रभू वालावकर इन्स्टाग्राम)
ऑरेंज ऑफव्हाईट मिक्सिंग
अंकिता – कुणालचा क्लासी लुक
अंकिता आणि तिचा होणारा नवरा कुणाल यांनी ऑरेंज आणि ऑफव्हाईट रंगाचे मिक्सिंग केलेले डिझाईनर लेंहगा आणि शेरवानी परिधान केले होते. दोघांनीही एकमेकांसह मॅच केल्यामुळे हा लुक अगदी उठावदार दिसून येत होता. अंकिताने संपूर्ण ऑरेंज आणि गोल्डन कॉम्बिनेशनचा लेहंगा घातला असून कुणालने ऑफव्हाईट शेरवानीवर ऑरेंज दुपट्टा घेत आपला लुक अंकिताशी मॅच केलेला दिसून आला.
वेव्ही हेअरस्टाईल
कशी आहे हेअरस्टाईल
अंकिताने या क्रॉप टॉप लेहंग्यासह अगदी साधी मात्र स्टायलिश अशी केसांची वेव्ही हेअरस्टाईल केलेली दिसून आली. ब्राऊन रंगाच्या केसांमुळे तिची ही हेअरस्टाईल खूपच स्टायलिश आणि उठावदार दिसून येत आहे. केसांना मधून भांग पाडत तिने दोन्ही बाजूने काही बटा मागे घेतल्या आहेत आणि संपूर्ण केसांना वेव्ही लुक दिलाय. तुम्हीही तुमच्या मेहंदी सोहळ्यासाठी अंकिताच्या या लुकवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.
दागिने
मिनिमल दागिन्यांनी सजली अंकिता
अगदी मिनिमल दागिने घालत तिने हा लुक कॅरी केलाय. अंकिताने या क्रॉप टॉप लेहंग्यासह केवळ मोठे मोत्याचे गोल्डन कानातले घातले आहेत आणि हातात अंगठी घातली आहे आणि तिचा लुक पूर्ण केलाय. तर कपाळावर लहानशी टिकली लावत तिने महाराष्ट्रीयन पारंपरिकताही जपली आहे. साधेपणातही सुंदर दिसता येतं हेच जणू तिने आपल्या या लुकमधून दाखवून दिले आहे. तर दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये आणि त्यांच्या हास्यामुळे सौंदर्यात अधिक भर पडली आहे
हिरव्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचा ब्लाउज परिधान करावा? मिक्स अँड मॅच फॅशन करून पहाच
मिनिमल मेकअप
साधेपणातील सुंदरता
अंकिताने आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी मेकअपही मिनिमल ठेवला असल्याचे दिसून येतेय. हल्ली हा नवा ट्रेंडच आला आहे. नो मेकअप लुकमध्ये अंकिताने फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, आयलॅशेस, आयशॅडो आणि न्यूड ब्राऊन लिपस्टिक लावली आहे आणि आपला हा क्लासी लुक पूर्ण केलाय. मेहंदीसाठी कमीत कमी मेकअप केला असून तिचा हा लुक खूपच आकर्षक दिसतोय.