Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : अस्सल महाराष्ट्रीयन चवीची झणझणीत ‘मिसळ’ बनवा घरीच, चव अशी की बोटं चाटत राहाल!

Misal Recipe : महाराष्ट्रीयन फूड लव्हर्ससाठी खास! आता तिखट, मसालेदार आणि पाहताच तोंडाला पाणी सुटणारी मिसळ अवघ्या १५ मिनिटांत बनवा घरीच. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल परफेक्ट.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 03:30 PM
Recipe : अस्सल महाराष्ट्रीयन चवीची झणझणीत 'मिसळ' बनवा घरीच, चव अशी की बोटं चाटत राहाल!

Recipe : अस्सल महाराष्ट्रीयन चवीची झणझणीत 'मिसळ' बनवा घरीच, चव अशी की बोटं चाटत राहाल!

Follow Us
Follow Us:
  • मिसळ हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे.
  • झणझणीत चवीची ही मिसळ घरीदेखील तयार करता येते.
  • चला मिसळची चवदार रेसिपी नोट करुन घेऊयात.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मिसळीला एक खास स्थान आहे. तिखट, मसालेदार आणि चविष्ट अशी मिसळ म्हणजे अनेकांच्या सकाळची आवडती न्याहारी. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकची मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारांनी हा पदार्थ राज्यभर प्रसिद्ध झाला आहे.

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

मिसळ हा फक्त पदार्थ नाही, तर महाराष्ट्राच्या चवीचा एक अविभाज्य भाग आहे. अनेक ठिकाणी सकाळी गरमागरम मिसळ खाण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात. तिखटपणा आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे हा पदार्थ खवय्यांच्या मनावर राज्य करतो. घरच्या घरी बनवलेली मिसळ अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी असते. झणझणीत रस्सा, त्यात कुरकुरीत चिवडा, कांदा, लिंबाची फोड आणि मऊसर पाव या सर्वांमुळे याची चव सर्वांच्याच मनात घर करते. चला महाराष्ट्रीयन चवीची ही मिसळ घरी कशी बनवायची याची पांरपारिक रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

उसळीसाठी

  • २ कप मोड आलेली मटकी
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ टोमॅटो चिरलेला
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २ चमचे लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १ चमचा गोडा मसाला
  • मीठ चवीनुसार
  • २ चमचे तेल
  • पाणी आवश्यकतेनुसार
कट किंवा रस्स्यासाठी
  • १ कांदा
  • १/२ कप सुका खोबरा
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • १ चमचा धणे
  • १ चमचा जिरे
  • २ चमचे लाल तिखट
  • तेल आवश्यकतेनुसार
इतर साहित्य
  • फरसाण
  • बारीक चिरलेला कांदा
  • कोथिंबीर
  • लिंबाच्या फोडी
  • पाव
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय

कृती

  • सर्वप्रथ मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून कुकरमध्ये थोडे मीठ आणि पाणी घालून २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा परता. कांदा सोनेरी झाल्यावर आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • आता त्यात हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून मसाला छान परता. त्यात शिजवलेली मटकी घालून काही मिनिटे शिजवा.
  • कट तयार करण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये कांदा, खोबरे, लसूण, धणे आणि जिरे भाजून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.
  • कढईत तेल गरम करून तयार वाटण परता. त्यात लाल तिखट आणि पाणी घालून उकळी आणा. हा रस्सा थोडा तिखट आणि पातळ असावा.
  • सर्व्हिंग बाउलमध्ये आधी उसळ घाला. त्यावर फरसाण, कांदा आणि कोथिंबीर घाला. वरून गरम कट ओता.
  • लिंबाचा रस पिळून गरम पावासोबत मिसळ सर्व्ह करा.
  • गरमागरम महाराष्ट्रीयन मिसळ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरते.
 

Web Title: Maharashtrian morning breakfast know how to make spicy and tasty misal at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.