रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या आलं आवळ्याचे सरबत, पचनक्रिया राहील सक्रिय
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. वाढत्या गर्मीमध्ये शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला थंडाव्याची नाहीतर ऊर्जेची जास्त आवश्यकता असते. कारण घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्यामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी कोणतेही कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले आलं आवळ्याचे सरबत प्यावे. आलं शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आवळ्याच्या रसात असलेले विटामिन सी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासोबतच त्वचेवरील ग्लो सुद्धा वाढवतो. आल्यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा पित्ताचा कोणताही त्रास होत नाही. चला तर जाणून घेऊया आलं आवळ्याचे सरबत बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)






