Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख… कोशिंबीरची सोपी रेसिपी

Koshimbir Recipe : महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय आणि जेवणाच्या ताटातील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे कोशिंबीर. निरनिराळ्या भाज्या आणि थंडगार दहीपासून तयार केलेला हा पदार्थ चवीला फार छान लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2025 | 09:39 AM
जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख... कोशिंबीरची सोपी रेसिपी

जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख... कोशिंबीरची सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणात कोशिंबिरीला एक वेगळंच महत्त्व आहे. कारण ही अशी डिश आहे जी जेवणाला हलकी, ताजीतवानी आणि पौष्टिक बनवते. महाराष्ट्रीयन जेवणाच्या ताटात भाजी, पोळी, भात, आमटीसोबतच कोशिंबीर असली की जेवणाला एक वेगळा टवटवीतपणा येतो. विशेषतः उन्हाळ्यात किंवा जड पदार्थानंतर थोडी कोशिंबीर खाल्ली की जेवण पचायला सोपं जातं.

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिऱ्याचा हलवा, नोट करून घ्या रेसिपी

कोशिंबीर ही फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. भाज्यांमधील फायबर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने यामुळे शरीराला पोषण मिळतं. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, मुळा, बीट, डाळी किंवा मोड आलेली कडधान्यं अशा अनेक प्रकारच्या कोशिंबिरी बनवल्या जातात. त्यात दही घातलं की चव अजूनच खुलून येते आणि गरमीच्या दिवसांत थंडावा मिळतो. पारंपरिक पद्धतीने जेवण वाढताना कोशिंबीर ही ताटात हमखास ठेवली जाते. लग्नसमारंभ, सण-वार, घरगुती कार्यक्रम असो – कोशिंबीर ही जेवणात रंग, चव आणि पोषण वाढवणारी बाजूची डिश म्हणून नेहमीच लोकप्रिय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • काकडी – २ (बारीक चिरलेली)
  • टोमॅटो – १ (बारीक चिरलेला)
  • कांदा – १ (बारीक चिरलेला)
  • गाजर – १ (किसलेले)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली, ऐच्छिक)
  • दही – ½ कप
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
कृती :
  • यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
  • यानंतर एका भांड्यात काकडी, टोमॅटो, कांदा आणि गाजर घाला.
  • त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर व मीठ टाका.
  • आता दही नीट फेटून भाज्यांमध्ये मिसळा.
  • मग त्यात थोडी साखर आणि लिंबाचा रस घाला.
  • सगळं छान एकत्र करून ५ मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून चवी एकजीव होतील.
  • तयार थंडगार कोशिंबीर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि ताटात वाढा.
  • ही कोशिंबीर साध्या जेवणासोबत किंवा बिर्याणी- पुलावसोबत चवील फार छान लागते.
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब, पारंपरिक चवीचा पौष्टिक पदार्थ

FAQs (संबंधित प्रश्न)

कोशिंबिरीचे फायदे काय?
कोशिंबिरीत जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात ज्यामुळे ती आरोग्यासाठी पाैष्टीक ठरते.

कोशिंबिर कशासाठी उपयुक्त ठरते?
जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि ताटाची शोभा वाढवण्यासाठी कोशिंबीर उपयुक्त आहे.

Web Title: Maharashtrian style tasty koshimbir recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • food recipe
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.